Type to search

युवराज पाटील यांच्यासह साथीदारांना अटक करण्याची मागणी!

maharashtra धुळे

युवराज पाटील यांच्यासह साथीदारांना अटक करण्याची मागणी!

Share
धुळे । डॉ.दिपश्री नाईक यांच्यावर हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे मनपा स्थायी समितीचे सभापती युवराज पाटील व त्यांचे साथीदार हे अद्यापही मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर कलम 307 व 354 प्रमाणे गुन्हा दाखल करून आठ दिवसाच्या आत अटक करावी, अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीतर्फे करण्यात आली असून त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. अन्यथा आमरण उपोषण करून आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा डॉ.दिपश्री नाईक यांनी दिला आहे.

याबाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, धनु युवराज पाटील, दिपक युवराज पाटील, गणेश राजेंद्र पाटील व राजेंद्र चैत्राम पाटील यांनी त्यांच्या 8 ते 10 साथीदारांसह डॉ.दिपश्री नाईक त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांचा विनयंभग केला. परंतु पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आलेली नाही किंवा त्याच्यावर 307 व 354 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्याचे साथीदार हे डॉ.दिपश्री नाईक यांच्या घरावर रात्री बेरात्री दररोज दगडफेक करीत आहे. त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देत आहे. याबाबत दि.14 मे रोजी डॉ.दिपश्री नाईक यांचे पती व लोकजनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष हे पोलीस अधीक्षक यांच्याकडे नगरसेवक युवराज पाटील यांच्या अटकेसंबंधी व 307, 354 कलम लावणयासंबंधी विचारपुस केली असता एसपींनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन नगरसेवक युवराज पाटील यांची पाठराखण करीत असल्याचे दिसून आले.

तरी आठ दिवसात त्यांच्यावर कलम 307, 354 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करावी. अन्यथा डॉ.दिपश्री नाईक या आमरण उपोषण करून आत्मदहन करतील व त्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे. निवेदनावर दिलीप साळवे, प्रमोद सोनवणे, शोभाताई चव्हाण, कुंदन खरात, मधुकर चव्हाण आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!