Type to search

राष्ट्र सेविका समितीतर्फे संचालन

maharashtra धुळे

राष्ट्र सेविका समितीतर्फे संचालन

Share
धुळे । राष्ट्राविषयी प्रेमभावना निर्माण व्हावी तसेच सर्वसामान्यांप्रति आपले दायित्व नव्या पिढीला कळावे, या उद्देशाने बुधवारी राष्ट्र सेविका समितीतर्फे धुळ्यात संचालन करण्यात आले. शहरातील न्यु सिटी हायस्कूलच्या मैदानावर ध्वज वंदन केल्यानंतर संचालनास सुरूवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या संचालनात ज्येष्ठ स्वयंसेविका आणि आरंभिक वर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थीनींनी भारत मातेच्या जयघोषात शोभायात्रा काढली.

राष्ट्र सेविका समितीच्या धुळे शाखेतर्फे सध्या निवासी शिबीर घेण्यात येत आहे. देवगिरी प्रांतात येणार्‍या निरनिराळ्या जिल्ह्यातील सेविकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभाग नोंदविला आहे. शिबिराच्या समारोपापुर्वी राष्ट्रसेविका समितीच्या शिबिरार्थींनी संचालन केले. पांझराकाठी असलेल्या न्यु सिटी विद्यालयाच्या मैदानावर ध्वजवंदन केल्यानंतर प्रमुख मार्गांवरून संचालन करण्यात आले. शहरातील महाराणा प्रताप चौक, फुलवाला चौक, गांधी पुतळा, नगरपट्टी, गल्ली क्रमांक सहा, महानगरपालिका जुनी इमारत रस्त्यावरुन न्यू सिटी हायस्कूल येथे संचलनाचा समारोप झाला.

यानिमित्ताने राष्ट्र सेविका समितीचा आरंभिक वर्गात सहभागी विद्यार्थीनींनी भारत मातेच्या जयघोष करीत शोभायात्रा काढली. शोभायात्रा न्यू सिटी हायस्कूल, झाशी राणी पुतळा, गुरू-शिष्य स्मारक, टॉवर बाग, जमनालाल बजाज मार्ग, आग्रा रोड या मार्गाने निघालेल्या शोभायात्रेचा समारोप न्यु सिटी हायस्कूल मध्ये झाला. राष्ट्राविषयी प्रेमभावना निर्माण व्हावी तसेच सर्वसामान्यांप्रती आपले दायित्व नव्या पिढीला कळावे, या उद्देशाने संचालन आणि शोभायात्रा काढण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!