Type to search

maharashtra धुळे

उन्हाळी सुट्या, लग्नसराईमुळे एस.टी.फुल्ल

Share
धुळे । उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईमुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे एसटी बसेस हाऊसफुल्ल होवुन जात आहे. उन्हाळी सुट्या आणि लग्न सराईचा धुमधडाका सुरु असल्याने धुळे आगारातर्फे जादा बसेसचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. आंतरराज्य, जिल्हाअंतर्गंत, शटल सेवा, शिवशाही, प्रासंगिक करार आणि परिवर्तन सेवेच्या जादा बस सोडण्यात येत आहेत. यामुळे धुळे आगाराला जादा उत्पन्न मिळत आहे.

सध्या मे हिटने नागरिक हैराण झाले आहे. मात्र उन्हाळी सुट्याही सुरू आहेत. आणि मे महिन्यातच लग्नाच्या मोठ्या तारीख असल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढतच आहेत. यासाठी धुळे आगारातर्फे लांबपल्याच्या 40 जादा बसेस सोडण्यात येत आहेत. आंतरराज्य फेर्‍यांमध्ये सुरत, अहमदाबाद बसफेर्‍यांचा समावेश आहे. पुण्यासाठी 18 गाड्या जादा सोडण्यात येत आहेत. तसेच मुंबई, औरंगाबाद जादा बसेस सोडण्यात येत आहेत.

विनावाहक म्हणून ओळखली जाणार्‍या परिवर्तन बसलाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी धुळे ते जळगाव, धुळे ते शिरपूर, धुळे ते नाशिक, नंदुरबार या मार्गावर ही सेवा सुरु केली आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होत आहे. तसेच वेळेत इच्छीत स्थळी पोहचणे शक्य होत आहे. त्यामुळे प्रवाशांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.

प्रासंगिक करार, बसेसला मागणी- सध्या लग्नसराईचा धुमधडका सुरू आहे. त्यामुळे वर्‍हाडी मंडळींची ने-आण करण्यासाठी एसटी बसेसला मागणी वाढली आहे. यासाठी एसटी आगाराकडून बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे होणार्‍या प्रासंगीक करारातूनही एसटीला चांगले उत्पन्न मिळत आहे.

आगाराचे उत्पन्न वाढले- सुट्या आणि लग्नसराईमुळे एसटीची प्रवासी संख्या वाढली आहे. यासाठी धुळे आगाराने जादा बस फेर्‍यांचे नियोजन देखील केले आहे. या माध्यमातून आगाराचे उत्पन्न वाढले आहे. साधारण हंगामात आगाराला प्रवासी वाहतूकीतून दिवसाला 18 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असते. परंतु सध्याचा गर्दीचा हंगाम पाहता दिवसाचे उत्पन्नात वाढ होऊन 20 ते 21 लाख रुपयांचे उत्पन्न दिवसाला मिळत असल्याची माहिती आगारातर्फे देण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!