Type to search

maharashtra धुळे

‘जवाहर’चे दोन युनिट आजपासून पुन्हा सुरु होणार!

Share
धुळे । गेल्या काही दिवसांपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली जवाहर शेतकरी सहकारी सुतगिरणी उद्या दि. 16 पासुन पुन्हा सुरू होणार आहे. गिरणीच्या तीन युनिटपैकी दोन युनिट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गिरणी कामगार व त्यांच्या कुटुंबियांमधून समाधान व्यक्त होत आहे.

जवाहर शेतकरी सहकारी सुतगिरणी व्यवस्थापन मंडळाने 2 मे रोजी गिरणी तात्पुरती बंद करण्याचे घोषित केले होते. त्यामुळे सुमारे साडेतीन हजार कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली होती. कच्चा माल व तयार सुत यांच्यातील दरांमध्ये तफावत, कोलमडलेले आर्थिक बजेट, सरकारचे कामगार विरोधी धोरण तसेच सुताला मागणी कमी झाल्याने व वाढते वीज बिल, कर्मचार्‍यांचा वाढता पगार यामुळे ही गिरणी तात्पुरती बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला होता. मात्र कामगाराहित समोर ठेवत सुतगिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी बैठका सुरू होत्या.अखेर सुतगिरणी पुन्हा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!