Type to search

धुळे

धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा

Share

धुळे । परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे त्वरित पंचनामे करावेे व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेने केली असून याबाबत आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे ज्वारी, बाजरी, मका, कपाशी, कडधान्य आदी प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हे सर्व पीक कापणी झाल्यानंतर बाजरी, ज्वारी, मका, या पिकांच्या कणसांना कोंब फुटले असून एकही दाणा हाती येणार नाही. तसेच कपाशीच्या उभ्या असलेल्या पिकाला बोंड आलेल्या कपाशीत कोंब फुटल्याने कपाशीचे पिकही उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल होवून पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. काही शेतकरी नैराश्यातून आत्महत्याही करीत आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे खसलेल्या शेतकर्‍यांना धीर देण्यासाठी प्रशासनाने त्वरित पिकांचे पंचनामे करुन ओला दुष्काळ जाहीर करावा असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर अतुल सोनवणे, हिलाल माळी, विलास चौधरी, देवराम माळी, चंद्रकांत म्हस्के, महावीर जैन यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!