Type to search

मूर्ती हटविण्याच्या याचिकेवर उद्या कामकाज

maharashtra धुळे

मूर्ती हटविण्याच्या याचिकेवर उद्या कामकाज

Share
धुळे । शहरातील पांझरा काठावरील झुलत्या पुलावरील भगवान शंकराची मूर्ती बांधकाम विभागाची परवानगी न घेता बसविली त्यामुळे ती काढण्यात येणार होती. परंतु आ. गोटे यांच्या समर्थकांनी न्यायालयात दाद मागितल्याने या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. 16 मे रोजी न्यायालयात कामकाजानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

काल जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील धार्मिक मंदिरे व प्राथनास्थळ हटविण्याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे, उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपायुक्त शांताराम गोसावी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, अभियंता एजाज शहा, मनपा अभियंता कैलास शिंदे आदी उपस्थित होते.

भगवान शंकराची मूर्ती हटविण्या संदर्भात याचिकेवर न्यायालयात 16 मे रोजी कामकाज होणार आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आपली बाजू मांडणार आहे. त्यासाठी सरकारी वकीलाची मदत घेतली जाणार आहे. त्यावर न्यायलय काय निर्णय देतील त्यानंतर शंकराच्या मूर्तीबाबत निर्णय घेण्यात येईल असे आयुक्त देशमुख यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!