Type to search

maharashtra धुळे

जशाच तसे उत्तर द्या!

Share

धुळे । जम्मु-कश्मिर येथील पुलवामा येथे भारतीय सैन्य दलावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या घटनेच्या जिल्ह्याभरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. साक्रीरोड वरील मोगलाई परिसरात व राणाप्रताप चौकात पाकिस्तानचा ध्वज जाळुन निषेध करण्यात आला. तर शिवसेनेतर्फे आक्रम्रक आंदोलन करण्यात आले. घटनेचा निषेध व्यक्त करत आता जशात तसे उत्तर द्यावे, अशी मागणीही विविध संघटनांतर्फे करण्यात आली असून तसे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर काल दि. 14 रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात जवान शहीद झाले आहेत. तर अनेक जवान जखमी झाले. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या भ्याड हल्ल्याचा देशभरातसह जिल्ह्यातही निषेध होत आहे.

मोगलाई परिसरात पाकचा ध्वज जाळुन निषेध- भ्याड हल्लाच्या निषेधार्थ मोगलाई कोंडाजी व्यायाम शाळेतर्फे साक्री रोडवरील नेहरु पुतळ्याजवळ पाकीस्तानचा झेंडा जाळुन निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच घोषणा देण्यात आल्या. यावेळी राकेश कुलेवार, संदीप सुर्यवंशी, संजय वाल्हे, किरण पवार, प्रितम शितोळे, संदिप शिंदे, संदिप पवार, सोनु पवार, निलेश पाटील, सुनिल सपकाळ, रुपेश भोकरे आदी उपस्थित होते.

हिंदू एकतातर्फेही पाकचा ध्वज जाळून निषेध- जम्मु-कश्मिर येथील पुलवामा येथे भारतीय सैन्य दलावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या घटनेच्या तीव्र निषेध करीत हिंदु एकता आंदोलनतर्फे पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. या घटना देशावर वारंवार होत असतात. त्यातील हा सर्वात मोठा हल्ला आहे. तरी या घटनेचा भाजपा सरकारने लवकर याचे प्रत्युत्तर सर्जिकल ट्राईक 2 या पध्दतीने द्यावे. भारतीय सैन्य दलातील 42 जवांनाची आहुती पाकिस्तानच्या 400 अतिरेक्यांचा खात्मा करून द्यावी. हिच खरी शहीद झालेल्या विर जवानांची श्रध्दांजली असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

पाकीस्तानला धडा शिकवाच- शहर विधानसभा युवक काँग्रेसतर्फेही जवानांवरील हल्ल्याचा तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भारत सरकारने जे सर्जिकल स्ट्राईक केले त्यापेक्षा ही भयंकर असे पाकिस्तानला हादरुन सोडणारे असे पुनश्च सर्जिकल स्ट्राईक करण्याची वेळ आता आली आहे. असे सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवावा व शहीद जवानांचे प्राण व्यर्थ जावू देवू नये, अशी मागणी शहर विधानसभा युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

जशाच तसे उत्तर द्या- जम्मु-काश्मिरमधील पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या पाकीस्तान पुरस्कृत दहशतवादी भ्याड हल्ल्याचा विश्व हिंदू परिषद, बजरंग दलतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी ज्या पध्दतीने पाठीत वार केला आहे व ज्यात भारतीय जवान शहीद झालेत त्याचा बदला सरकारने जशास तसे उत्तर देवून दहशतवाद्यांचा खात्मा करून घ्यावा. आपल्या सैनिकांचे मनोधैर्य उंचावण्याची वेळ आली आहे. सरकारने दहशतवादी पोसणार्‍या पाकिस्तानवर लष्करी कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलतर्फे करण्यात आली आहे.

शिवसेनेचे आक्रमक आंदोलन!
धुळे । आतंकी हल्ल्यात अनेक जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेने आक्रमक आंदोलन केले. या हल्ल्याला जबाबदार असलेल्या जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेल्या हाफीज सईद व मसुद अजहर यांच्या प्रतिमा साक्षीला ठेऊन पाकच्या प्रतिकात्मक पुतळ्याला प्रबोधनकार ठाकरे संकुलच्या फलकाजवळ फासावर लटकविण्यात आले. त्यानंतर या पुतळ्याला फरफटत ओढत नेऊन महाराणा प्रताप चौकात तो जाळण्यात आला.
तत्पूर्वी हाफीजच्या प्रतिमेला तवारीने भोसकण्यात आले. तर अनेकांनी या प्रतिकात्मक पुतळ्यावर तलवारीने प्रहार करीत आपला संताप व्यक्त केला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादी संघटनांचा निषेध असो, अशा धिक्काराच्या घोषणाही देण्यात आल्या.

शिवसेनेच्या या आंदोलनात अतूल सोनवणे, प्रा.शरद पाटील, हिलाल माळी, संजय गुजराथी, गुलाब माळी, भुपेंद्र लहामगे, पंकज गोरे, हेमाताई हेमाडे, धिरज पाटील, किरण जोंधळे, रामदास कानकाटे, मच्छिंद्र निकम, कैलास मराठे, विलास चौधरी, पुरुषोत्तम जाधव, प्रमोद चौधरी, कुणाल कानकाटे, प्रफुल्ल पाटील, भटू गवळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मनपा सभागृहात सर्वपक्षियांकडून श्रद्धांजली
धुळे । मनपा सभागृहात सर्वपक्षिय सभा घेवून पुलवामा येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासह शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी महापौर चंद्रकांत सोनार म्हणाले की, अतिरेकी संघटनांना सहकार्य करणार्‍यांचा बंदोबस्त सरकारने करायला हवा. संपुर्ण देश प्रधानमंञ्यासह सैन्याच्यापाठीशी उभा आहे. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी देखील या घटनेचा निषेध केला आणि भारतीय सैन्य चोख प्रतीउत्तर पाकला देईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी पार्टीतर्फे नगरसेवक अमिन पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. या वेळी नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शहिद जवानांना श्रद्धांजली, रॅलीसह कॅण्डल मार्च
शिरपूर । शिरपूर एज्युकेशन सोसायटी, आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट व श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित विविध शाखांच्या वतीने सायंकाळी श्रद्धांजलीचे अनेक फलक हाती घेवुन हजारो विद्यार्थ्यांनी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च काढण्यात आला.

हजारो विद्यार्थ्यांनी हातात श्रद्धांजलीचे फलक, देशभक्तीपर फलक, बॅनर्स घेवून कॅण्डल मार्च काढला. दहशतवादी कृत्य करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, देशाला हादरवून सोडणार्‍या व जवानांवरील या निंदणीय हल्ल्याच्या घटनेचा निषेध म्हणून तसेच सर्व शहीदांना श्रद्धांजली साठी कॅण्डल मार्च निघाला.

जम्मू-काश्मिरमध्ये पुलवामा येथे काल झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरातील पाताळेश्वर चौक येथील वीर शहीद स्मारक येथे वीर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येवून त्यानंतर भव्य कॅण्डल मार्च काढण्यात आला. उपस्थित अनेक पदाधिकारी, पोलिस प्रशासन, अधिकारी यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून विर स्मारक येथे सर्व हजारो विद्यार्थ्यांनी मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली.

संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठया संख्येने यावेळी सहभागी झाले होते. कॅण्डल मार्च रॅलीस आर.सी.पटेल मेन बिल्डींग येथून सुरुवात झाली.

नगर परिषद समोरुन कुंभार टेक, मारवाडी गल्ली, विजय स्तंभ, मेनरोडने पाताळेश्वर चौकात शहीद स्मारकापर्यंत येवून पोहचली. मुकेशभाई पटेल मिलीटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तसेच अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूल, आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या सर्व शाळा, सर्व महाविद्यालये यातील 2 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

शिंदखेडा येथे आज मूकमोर्चाचे आयोजन
शिंदखेडा । जम्मू कश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवादी हल्लयात सीआरपीएफचे जवान शहीद झाले. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या दि. 16 रोजी सकाळी 10 वाजता भगवा चौक, शिंदखेडा येथून घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे मूक मोर्चाचा मार्ग भगवा चौक, तहसील कार्यालय चौक, गांधी चौक, रथ गल्ली, शनि मंदिर चौक व समारोप गांधी चौक येथे तहसीलदार यांना निवेदन देऊन होईल.

या मूक मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी, व्हावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय सुरक्षा मंच यांनी केले आहे.

पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल!
जम्मुकश्मीर मधील पुलवामामध्ये झालेली घटना अत्यंत्य दुखःद आहे. आतंकवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते. पाकीस्तानमध्ये लपलेल्या दहशतवाद्याला त्यांनी भारताच्या ताब्यात द्यावे. या भ्याड हल्ल्याचे उत्तर आपला देश, सैनिक व पंतप्रधान देतीलच. याची मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल.
– अनुप अग्रवाल, महानगर जिल्हाध्यक्ष, भाजपा

या प्रश्नाकडे मंत्र्यांनी लक्ष देणे आवश्यक!
पुलवाला येथे भारतीय सैन्यावर झालेला हा अतिशय भ्याड हल्ला आहे. या घटनेचा जाहीर निषेध करतो. आता देशाच्या मंत्री, नेत्यांनी याप्रश्नाकडे लक्ष घालणे आवश्यक आहे. 56 इंचांची छाती म्हणवून घेणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकीस्तानात जावून दहशतवाद्यांचे मुडदेे पाडू असे म्हटले होते. मात्र इकडे रोज जवान शहिद होत आहेत.
– राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार

पुन्हा सर्जीकल स्ट्राईकने उत्तर द्यावे!
देशात पाकीस्तानचे छुपे हल्ले नेहमीचेच झाले आहेत. बघु, करू म्हणण्यात अनेक जवानांना शहीद व्हावे लागत आहे. त्यामुळे आता सोक्षमोक्ष लावण्याची गरज आहे. पुन्हा सर्जीकल स्ट्राईक करून पाकीस्तानला उत्तर देण्याची गरज आहे. देशाची जनता देखील सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. कालचा हल्ला अत्यंय निर्दयी होता. त्याच पध्दतीने दहशतवाद्यांना उत्तर देण्याची गरज आहे. एकीकडे देश महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत आहे. परंतू अशा हल्ल्यांमुळे भारत महासत्ता कसा होईल. त्यामुळे आधी पाकीस्तानला संपविणे आवश्यक आहे.
– हिलाल माळी, जिल्हाध्यक्ष, शिवसेना

सैन्याच्या मागे उभे राहण्याची वेळ!
जवानांवरील हल्ल्याचा निषेध करतो. आता पाकीस्तानला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. नुसत्या गप्पा, गोष्टी करून होणार नाही. कृती करण्याची वेळ आली आहे. तसेच सत्ताधारी व विरोधकांनी देखील या प्रश्नावर राजकारण करू नये. एकत्र येवून सैन्याच्या मागे उभे राहण्याची गरज आहे.
– तेजस गोटे, लोकसंग्राम

देशावरील सर्वात मोठा आघात!
जवानांवरील हल्ल्याची ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. एकाच वेळेस येवढ्या जवानांचा मृत्यू म्हणजे यात आपण सुरक्षा व्यवस्थेत कमी पडलो तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे देशाने आपली सुरक्षा व्यवस्था अधिक मजबुत करणे आवश्यक आहे. देशावरील हा सर्वात मोठा आघात आहे. सर्वांनी आता एकमेकांकडे बोट न दाखविता, असा आघात परतून लावण्यासाठी सर्वसामान्यांनी तन-मन आणि धन आणि देशाला जे आवश्यक आहे, ते देण्याची तयारी ठेवली पाहीजे.
– नितीन बंग, अध्यक्ष व्यापारी असोसिएशन

जशाच तसे उत्तर देण्याची गरज!
हा दहशतवादी हल्ला निंदनीय आहे. भारत अति सहन करतो असे त्यांना वाटते म्हणून त्यांची मजल वाढत चालली आहे. गेल्या वेळेस सर्जीकल स्ट्राईक करूनही त्यांचा पाहीजे तेवढा परिणाम झालेला दिसून येत नाही. त्यामुळे आता जशाच तसे उत्तरे देण्याची वेळे आली आहे.
– अ‍ॅड.शामकांत पाटील, माजी अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन

कलम 357 रद्द करणे आवश्यक!
पाकीस्तानने भारतविरूध्द तोडा आणि फोडा अशी एकच निती ठेवली आहे. देशाने भारत- पाकीस्तान करार बंद करून जोपर्यंत थेट पाकीस्तावर हल्ला करीत नाही तोपर्यंत दहशदवादी हल्ले थांबणार नाहीत. दहशतवाद्याने कश्मीरी लोकांचेही समर्थन आहे. त्यामुळे भारताने कश्मीरमधील कलम 357 रद्द करणे आवश्यक आहे. तसेच सैनिकांना प्रत्युत्तराची सुट दिली पाहीजे.
– प्रसाद देशमुख, जिल्हाध्यक्ष मनविसे

एक दिवसाचा दुखवटा पाळला पाहिजे होता!
हा देशातील सर्वात मोठा भीषण दहशतवादी हल्ला आहे. देशासाठी लढता-लढता जवानांचा बळी जात आहे. या घटनेनंतर केंद्र व राज्य सरकाने किमान एक दिवसाचा दुखवटा पाळला पाहीजे होता पंरतू तरीही विविध कार्यक्रमांचे उद्घाटन होत आहेत. याचा मी निषेध करतो.
– शरद पाटील, माजी आमदार

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!