Type to search

शंकराच्या मूर्तीला विरोध नाही- डॉ.सुभाष भामरे

maharashtra धुळे

शंकराच्या मूर्तीला विरोध नाही- डॉ.सुभाष भामरे

Share
धुळे । शहरातील पांझरा नदी किनारी बसविण्यात येत असलेल्या भगवान शंकरांच्या मूर्तीला विरोध असण्याचे काही कारण नाही अशी भूमिका केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी पत्रकाव्दारे व्यक्त केली आहे.

डॉ. भामरे यांनी पत्रकात म्हटले आहे की, धुळे शहर विकसीत व्हावे, या शहरात सर्व सुविधा जनतेला मिळाव्या अशी आपली प्रामाणिक प्रयत्न आहेत. त्यासाठीच मी प्रयत्नशील आहे. हिंदुत्व आणि विकास हीच माझी आणि माझ्या भारतीय जनता पक्षाची आग्रही भुमिका आहे. धुळ्यातील पांझरा नदी किनारी बसविण्यात येत असलेल्या भगवान शंकरांच्या मूर्तीला देखील विरोध असण्याचे काही कारण नाही. याबाबत आपला दुरान्वये संबंध देखील नाही. शहरात कुठे काही झाले की त्याचा संबंध आपल्याशी जोडण्याचा प्रकार काही जण करतात. त्यांच्या कृतीतून निर्माण केल्या जाणार्‍या वादांमध्ये विनाकारण आपले नाव गोवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते कदापी मान्य नाही. अशी भुमिका डॉ.सुभाष भामरे यांनी पत्रकाव्दारे व्यक्त केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!