Type to search

धुळे

अवधान शिवारात 63 हजारांचा दारूसाठा जप्त

Share

धुळे । मोहाडी पालिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान गाव शिवारातील एका ढाब्याच्या मागील बाजूस केलेल्या कारवाईत एकुण 63 हजार रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी एका जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दारू तस्करी, पैशांचे अनधिकृत व्यवहार यासंदर्भात विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सर्व पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांना दिले आहेत. या मोहीमेच्या अनुषंगाने गोपनीय माहिती काढण्यात येत असतांना अवधान फाट्याजवळील रोहित ढाबाच्या मागील बाजूस असलेल्या काटेरी झुडुपात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा साठा करुन ठेवल्याची गुप्त माहिती दि.15 रोजी मोहाडी उपनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांना मिळाली होती. याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता काटेरी झुडुपात दत्तू पाटील (वय 31 रा.अवधान, ता. धुळे) याने दारूसाठा ठेवल्याचे समोर आले. त्यावरुन निरीक्षक गोराडे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील हेकॉ प्रभाकर ब्राम्हणे, पोकॉ गणेश भामरे, सचिन वाघ, जितेंद्र वाघ, अजय दाभाडे, दीपक महाले, कांतीलाल शिरसाठ यांनी नियोजनबध्द छापा टाकून तपासणी केली. याठिकाणी दत्तू पाटील याच्या कब्जात अवैध मद्यसाठा मिळून आला.

या कारवाईत 32 हजार 60 रुपये किमतीच्या इम्पिरीयल ब्लू कंपनीच्या 5 पांढर्‍या रंगाच्या खोक्यांमध्ये 180 मिलीच्या 229 क्वॉर्टर, 28 हजार 310 रुपये किंमतीच्या रॉयलस्टॅग कंपनीच्या 3 पांढर्‍या रंगाच्या खोक्यांमध्ये 180 मिली 149 क्वॉर्टर, 2 हजार 496 रुपये किंमतीच्या देशी दारू टॅगोपंचच्या एक खाकी रंगाच्या खोक्यात 180 मिली 48 क्वॉर्टर असा एकूण 62 हजार 866 रुपये किमतीचा दारूचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई गणेश भामरे यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित दत्तू पाटील याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!