Type to search

धुळे

एफसीबीतर्फे जिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कार

Share

धुळे | देशभरातील ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधून धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस एफसीबीतर्फे राष्ट्रीय स्तरावरील मानाचा  रुपे डेबीट व केसीसी कार्ड इनोव्हेशन ऍवार्ड  तसेच  बेस्ट एन.पी.ए. मॅनेजमेंट ऍवार्ड अशा दोन पुरस्कारानेे गोवा येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात गौरविण्यात आले आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी दिली आहे.

देशपातळीवरील सुमारे ६०० प्रतिनिधींच्या उपस्थितीत गोवा राज्याचे सहकार, कला व सांस्कृतिक कार्यमंत्री ना.गोविंद गावडे यांच्या हस्ते धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक व आय.टी.व्यवस्थापक यांनी पुरस्कार स्वीकारला.

यापूर्वी मागील वर्षी सन २०१८-१९ मध्ये धुळे जिल्हा बँकेस एफसीबीतर्फे राष्ट्रीयस्तरावरील  बेस्ट डाटा सिक्युरिटी पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले होते.  तसेच बँकींग फ्रंटीयरने आतापर्यंत बँकेस राष्ट्रीयस्तरावरील एकुण तीन पुरस्कार मिळाले आहेत.

अत्याधुनिक सेवा कार्यान्वित

नाबार्ड व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिशा निर्देशानुसार डिजीटल इंडिया अंतर्गत ग्राहकांना बँकेमार्फत जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध होण्यासाठी वेळोवेळी संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभले असून त्यानुसार बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी बँकेमार्फत डिजीटल बँकींगव्दारे अत्याधुनिक सेवा कार्यान्वित करण्यासाठी घोडदौड सुरु केली असून मोलाची कामगीरी केली आहे.

– राजवर्धन कदमबांडे

चेअरमन, जिल्हा बँक 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!