Type to search

धुळे

वनविभागात मेंढपाळांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

Share

धुळे | वनविभागाकडून होणारा त्रास आणि अन्य मागण्यांसाठी आज ठेलारी समाजाचे अध्यक्ष शिवदास वाघमोडे आणि हरसुणे येथील सात मेंढपाळ ठेलारी या आठ जणांनी आज वनविभागात अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. आत्मदहन करणार्‍या दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत महाराष्ट्र ठेलारी महासंघाने दिलेली माहिती अशी की, मेंढपाळ ठेलारी समाज मेंढ्यांना घेवून वनात राहणारा समाज आहे. मेंढपाळ ठेलारी समाजाचे ८० टक्के लोकांचे जीवन हे मेंढपाळ व्यवसायावर होते. सरकारने मेंढपाळ ठेलारी समाजाच्या मेंढ्यांना चारण्यासाठी राखीव जंगल ठेवले होते. परंतु त्याची माहिती मेंढपाळ ठेलारी समाजाला दिली जात नाही. ठेलारी समाजाच्या मेंढ्या जंगलात चारण्यास वन कर्मचारी व अतिक्रमणधारकांकडून वेळोवेळी अडवणूक केली जाते. काही वेळ मारहाण करुन त्यांच्यावर केसेस केले जातात. ठेलारी बांधवांनी विरोध केला तर त्याचा राग येवून अतिक्रमणधारकांनी ठेलारी समाजाच्या महिला व पुरुषांना मारहाण केली. त्यांची माहिती देण्यात आली पण दखल घेण्यात आलेली नाही. ठेलारी समाजाला वनजमीन चारण्यासाठी जंगल राखीव असून मेंढ्या चारण्यास अटकाव केला जातो.

दुसरीकडे अतिक्रमणधारक झाडे तोडून अतिक्रमण करतात पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे ६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र ठेलारी महासंघ व हरसुणे गावातील ठेलारी ग्रामस्थांतर्फे मुख्य वनसंरक्षकांना निवेदन दिले होते. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ठेलारी समाज अध्यक्ष शिवदास वाघमोडे आणि रामदास कारंडे, दिनेश सरग, पुंडलिक थोरात, बाळू कोरडकर, लक्ष्मण व्हडगर, नारायण सुळे, वामन सुळे यांनी अंगावर रॉकेल टाकून वनविभागात आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला.

पोलीस यंत्रणा व वनविभागाची धावपळ

मेंढपाळांनी सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला होता. त्यामुळे वनविभाग सतर्क होता. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या बंबला घटनास्थळी बोलवून घेतले होते. आठ जणांनी आत्महदनाचा प्रयत्न केल्यामुळे वनविभाग व पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!