Type to search

धुळे

वेळोवेळी भ्रष्टाचाराचा मुद्दा सभेत मांडल्यामुळे नगरसेवक नागसेन बोरसेंना धमकीचा फोन!

Share

धुळे | वेळोवेळी भ्रष्टाचाराचा मुद्या सभेत मांडत असल्यामुळे मला धमकी देणारे फोन येत आहेत. अशी तक्रार नागसेन बोरसे यांनी स्थायी सभेत केली. त्यावर प्रशासनाकडून भ्रष्टाचाराची आपण तक्रार केल्यामुळे चौकशी करण्यात येईल असे सांगण्यात आले.

मनपाच्या  भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात बुधवारी ३ वाजता स्थायी समितीची विशेष सभा  स्थायी समिती सभापती युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आयुक्त अजिज शेख, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ आदींसह विभाग प्रमुख उपस्थित होते़

विधानसभा निवडणूकीची आचार संहिता जाहीर होण्यापूर्वी शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी विकास कामांना झपाट्याने मंजूरी दिली जात आहे़ आज स्थायीच्या अवघ्या ३० मिनिटांच्या बैठकीत तब्बल १३ विषयांना मंजूरी देण्यात आली़  दरम्यान, जुन्या मनपा इमारतीच्या मागे (खाऊगल्ली) हॉकर्स झोन विकसीत करण्यास यावेळी मंजूरी देण्यात आली.,

स्थायीची पहिल्या सभेत बांधकाम विभागाकडून होत असलेल्या विकास कामासाठी १ ऑक्टोबर २०१८ ते ३१ ऑगस्ट २०१९ अखेर झालेल्या विकास कामांची कार्यादेशाची स्थायी समितीसमोर ठेवण्यात आली होती़ त्याला मंजूरी देण्यात आली. मनपा मालमत्ता कराची थकबाकी खटलाबाबत राष्ट्रीय लोकअदालत आयोजनासाठी ४३ हजार ३० रूपये खर्चास यावेळी मंजूरी देण्यात आली. प्रभाग १८ मधील रमाई नगर भागातील यशवंत नगर घरकूल सार्वजनिक शौचालयापासून ते उत्कर्ष कॉलनी प्रशांत तिवारी यांच्या घरासमोर नाल्यावर संरक्षण भिंत बांधण्यासाठी निविदा दर मंजूर करणे, जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून राष्ट्रवादी भवन ते स्टेशनरोड पर्यत रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी निविदा दर मागविण्यासाठी मंजूरी देण्यात आली. मोराणे गावात पाईप लाईन व व्हॉल टाकण्यासाठी २ लाख ९६ हजार ६५३ कार्यात्तर मंजूरी यावेळी देण्यात आली.  तर आज दुपारी झालेल्या दुसर्‍या सभेत अमृत अभियानातर्ंगत अक्कलपाडा धरणातून धुळे शहर पाणीपुरवठा योजनेसाठी प्राप्त झालेल्या निविदा दरांना मंजूरी देण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!