Type to search

धुळे राजकीय

नव महाराष्ट्र घडविण्यासाठी मतदान करा

Share

दोंडाईचा । आपल्या एका मताने भारत देशाची शान असलेल्या जम्मु आणि काश्मिरमध्ये लागू असलेले 370 कलम हटले हे कलम हटल्यामुळे जम्मु आणि काश्मिरमधील दलित आणि आदिवासींना आरक्षण मिळण्यास सुरूवात झाली असून आता तेथील प्रतिनिधी देखील संसदेत आणि विधानसभेत प्रतिनिधीत्व करू शकतील, आपल्या एका मतामुळे देशात एवढा मोठा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकले. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवारसह अन्य उपयुक्त योजनांमुळे राज्याला विकासाची नवी दिशा दिली असून येत्या काळात नव महाराष्ट्र घडविण्यासाठी भाजपाला मतदान करा असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले.

आज दोंडाईचा येथील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ना.जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ जे.पी.नड्डा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा.डॉ.सुभाष भामरे, दोंडाईचा शहराच्या नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल, शिंदखेडा नगराध्यक्षा सौ.रजनी वानखेडे, अमित पाटील, दुध संघाचे अध्यक्ष विक्रांत रावल, माजी नगरसेविका अनिता देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ पाटील, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, ज्ञानेश्वर भामरे, ललित वारूळे, शहराध्यक्ष प्रविण महाजन, हिरामण गवळी,माधुरी बाफना आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना जे.पी.नड्डा म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने गेल्या पाच वर्षात अनेक यशस्वी योजना राबविल्या असून त्यात सर्वात प्रमुख बाब म्हणजे शेतकर्‍यांना केलेली कर्जमाफी योजना आहे, एवढेच नव्हे तर आपल्या भागातील सुलवाडे जामफळ उपसा योजनेसाठी तब्बल 2400 कोटींचा निधी देवून त्याचे काम सुरू केले आहे, त्या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर आपला भाग सुजलाम सुफलाम होणार आहे, त्याचप्रमाणे मनमाड-इंदूर रेल्वे मार्गामुळे आपल्या भागात पायाभुत सुविधा मजबुत होणार असून आपल्याकडे आर्थिक सुबत्ता निर्माण होणार आहे, सन 2014 पूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने सर्वच क्षेत्रात केलेल्या भ्रष्ट्राचारामुळे आपले राज्य बदनाम झाले होते असा आरोप देखील कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केला.

पुढे श्री. नड्डा म्हणाले की, मोदी सरकारने गरीबांसाठी आयुष्यमान भारत, उज्ज्वला गॅस, प्रधानमंत्री किसान योजना, अशा कल्याणकारी योजनांमुळे गरीबांचा मोठा फायदा झाला असून पूर्वी धुरामुळे हैराण झालेल्या माता भगिनींना आता गॅसमुळे मोठी सुविधा मिळाली असल्याचे देखील त्यांनी यावेळी संगितलेे.

जयकुमार रावल हे तरूणपणापासुन माझे परीचित असून त्यांचा जोष खूप मोठा आहे, त्यांची विकासाची तळमळ जवळून पाहिली असून अशा विकासासाठी संघर्ष करणार्‍या उमेदवाराला आपण प्रचंड मताधिक्याने निवडुन दयावे असे देखील जे.पी.नड्डा यावेळी म्हणाले.

यावेळी ना.रावल म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुरदृष्टीमुळे मी शिंदखेडा मतदारसंघात कोटयावधीचा निधी आणला असून आपल्या मतदारसंघात आता जलयुक्त शिवारसह अन्य योजनामुळे पाणीच पाणी झाले आहे, पुढील काळात सुलवाडे जामफळ आणि प्रकाशा बुराई योजनेमुळे दुष्काळ कायमचा हददपार होण्यास मदत होणार आहे, आज शिंदखेडा मतदारसंघातील जनता विकासासाठी भक्कमपणे माझ्या पाठिशी उभी राहिल्यामुळे माझे मनोबल वाढले असून मतदानाच्या दिवशी सर्वांनी एकत्रितपणे भाजपाला मत देवून प्रचंड असा विजय आपला करू या असे आवाहन ना.रावल यांनी यावेळी केले. प्रास्ताविक प्रविण महाजन यांनी तर सुत्रसंचालन डी.एस.गिरासे यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!