Type to search

धुळे राजकीय

काँग्रेसला शिंदखेडा मतदारसंघात पुन्हा मोठा हादरा

Share

दोंडाईचा । दोंडाईचा येथील देशमुख गटाने विकासाला जाहिर पाठिंबा, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ललित वारूळेंचा प्रवेश, काँग्रेसचे राजेंद्र देसलेंचा प्रवेश, प्रा.सुरेश देसलेंचा प्रवेश पाठोपाठ आज पुन्हा एक मोठा हादरा बसला असून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांनी आज भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या हस्ते आणि ना.जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

यावेळी खा. सुभाष भामरे, नगराध्यक्षा सौ. नयनकुंवरताई रावल, नगराध्यक्षा सौ.रजनी वानखेडे, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, माधुरी बोरसे, नारायण पाटील, कामराज निकम, तालुकाध्यक्ष नथा पाटील, विक्रम पाटील, अमित पाटील, ललित वारुळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्ञानेश्वर भामरे हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असून केशरानंद उद्योग समुहाच्या माध्यमातून त्यांचे शिंदखेडा मतदारसंघात मोठे व्यावसायिक प्रस्थ आहे. त्यांनी सन 2004 शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढली होती त्यावेळी त्यांचा केवळ 5 हजार मतांनी पराभव झाला होता, यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात येते, त्याच्या प्रवेशामुळे आघाडीला हा सर्वात मोठा हादरा बसला असून आता आघाडीचा तालुक्यातील प्रचारप्रमुखच भाजपात गेल्यामुळे आघाडीची स्थिती खिळखिळी झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!