Type to search

धुळे

सामाजिक बांधिलकी मानणारी, विद्यार्थी घडविणारी संस्था उत्तम- हेमराज बागुल

Share

धुळे | उत्तम शिक्षण संस्था तीच असते, जी सामाजिक बांधिलकी मानणारे विद्यार्थी घडविते आणि समाजालाही सकारात्मक वैचारिक दिशा देते. त्या संस्थेने केलेल्या सामाजिक योगदानाच्या प्रमाणातच तिची प्रगती मोजली जाते आणि विद्यावर्धिनी संस्था हे सर्व निकष पूर्ण करते, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आणि माजी विद्यार्थी हेमराज बागुल यांनी केले.

विद्यावर्धिनी महाविद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी श्री.बागुल बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष प्रा.पी.डी. दलाल होते. याप्रसंगी व्यासपीठावर न्या.सारंग कोतवाल, न्या.शामकांत बहाळकर, प्रा.शरद पाटील, गव्हर्निंग कॉन्सिलचे चेअरमन अध्यक्ष छाजेड, सचिव युवराज करनकाळ, विनोद मित्तल, उदय शिनकर, डॉ.दिलीप पाटील, पितांबर महाले, उपाध्यक्ष केशव बहाळकर, जगदीश गायकवाड, प्रा.प्रकाश पाठक, डॉ.नीला पांढरे, ओ.पी.अग्रवाल, किशोर बाफना, प्राचार्य डॉ.शुभदा ठाकरे, संघाचे कार्याध्यक्ष प्रशांत लगडे उपस्थित होते.

प्रारंभी परिसरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते वृक्षांचे पूजन करून प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. कोणतेही पूर्णत्वाकडे जाणारे व्यक्तीमत्व शिक्षण संस्था व शिक्षकांच्या संस्कारातून घडते. विद्यावर्धिनीतील संस्नरामुळेच असंख्य विद्यार्थी घडले. त्यांच्यात सदगुणांची पेरणी विद्यावर्धिनीच्या मातीतूनच झाली, असे यावेळी न्या.श्यामकांत बहाळकर यांनी सांगितले. संस्थेला विधायक दिशेने नेण्याची जबाबदारी माजी विद्यार्थ्यांची असल्याचेही त्यांनी सांगितले.

न्या.सारंग कोतवाल, चेअरमन अक्षय छाजेड यांनी यांनी मनोगत मांडले. माजी विद्यार्थ्यांची संस्थेशी भावनिक नाळ जुळलेली असते. त्यामुळे संस्थेच्या विकासाला चालना देणे ही त्यांची जबाबदारी आहे, असे प्रा.शरद पाटील म्हणाले.

कार्यक्रमात प्राचार्य डॉ.शुभदा ठाकरे यांनी संस्थेच्या विद्यमान प्रगतीची माहिती दिली. डॉ.प्रशांत लगडे यांनी यावेळी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयासाठी काय केले पाहिजे याविषयी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जगदिश देवपुरकर व प्रा.खलील अन्सारी यांनी केले. आभार प्रा.विलास चव्हाण यांनी मानले. दुसर्‍या सत्रात रक्तदान, माजी विद्यार्थ्यांचे मनोगत व मुक्त संवाद कार्यक्रम झाला. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, जगदिश देवपूरकर लिखीत व पारिजात चव्हाण यांनी गाईलेल्या विद्यावर्धिनी गीताच्या सीडीचे विमोचन करण्यात आले. अखेरच्या सत्रात संस्थेचे संस्थापक, त्यांचे वारस, माजी विद्यार्थी प्रतिनिधी, सेनवानिवृत्त कर्मचारी व प्राध्यापक यांचा सत्कार करण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!