Type to search

धुळे राजकीय

धुळे शहर मतदारसंघात भाजपची उमेदवारी अनुप अग्रवाल यांना द्या

Share

धुळे | आगामी विधानसभा निवडणुकीत धुळे शहर मतदार संघात भाजपची उमेदवारी शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांना द्यावी, अशी मागणी आजी-माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

महाजनादेश यात्रेच्या दुसर्‍या टप्प्यात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धुळ्यात महारॅली झाली. तर दुसर्‍या दिवशी हॉटेल टॉपलाईनमध्ये पत्रपरिषद झाली. सकाळी महापालिकेच्या ५० नगरसेवकांसह काही प्रमुख पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नगरसेवक हिरामण गवळी, माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्यासह शिष्टमंडाळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर अनुप अग्रवाल यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. मनपात पुर्वी भाजपाचे तीन नगरसेवक होते.

आता ५० संख्याबळ झाले आहे. जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खा. डॉ. सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुप अग्रवाल यांनी महापालिका निवडणुकीत दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडली. शहरात पक्ष मजबुत केले. श्री.अग्रवाल यांच्या कारकिर्दीत दोन वेळेसे पक्षाचे खासदार व आमदार निवडुन आले आहेत. शहराच्या विकासासाठी प्राप्त निधीबाबत त्यांनी पाठपुरावा केला आहे. त्यांचा संपर्क व संघटन कौशल्य पाहता, शहर विधानसभा मतदार संघातून अनुप अग्रवाल यांनाच पक्षातर्फे उमदेवारी द्यावी, अशी अपेक्षा भाजपाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!