Type to search

धुळे

डॉ. जितेंद्र ठाकुर यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला अहवाल

Share

धुळे | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी शिरपूर तालुक्यातील संवाद यात्रेचा अहवाल सादर केला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार रावल व खा. डॉ सुभाष भामरे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी हे देखील उपस्थित होते.

डॉ.जितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून संवाद यात्रेचे नियोजन करण्यात आले होते.शिरपूर तालुक्यातील जनतेचे समस्या व सरकारच्या विविध योजनांची माहिती, तालुक्यातील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ही संवाद यात्रा डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी आयोजित केली होती. गेल्या एक महिन्यापासून या संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. जनतेशी थेट संवाद साधून त्यांंचे प्रश्न सोडवण्याचा संकल्प डॉ. जितेंद्र ठाकूर यांचा आहे.काही समस्या व प्रश्न तालुका व जिल्हा पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न डॉ. जितेंद्र ठाकुर यांनी या संवाद यात्रेदरम्यान केला आहे. मात्र अनेक समस्या या राज्य पातळीवरच्या असल्याने त्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे. या संपूर्ण संवाद यात्रेत सिंचन, पाणी, रेशन न मिळणे, रेशन कार्डच्या समस्या, रस्ता, विज, पाणी सारख्या मुलभूत सुविधांपासून देखील वंचित असणे असे असंख्य प्रश्न संवाद यात्रेच्या दरम्यान तालुक्यातील जनतेने मांडले.

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते त्यावेळी शिरपूर तालुक्यातील संवाद यात्रेचा अहवाल डॉ.जितेंंद्र ठाकूर यांनी सादर करण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरीसह भाजपाचे मान्यवर उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!