Type to search

धुळे

धुळे जिल्ह्यात दहीहंडीची धूम; गोविंदाचा जयघोष

Share

धुळे | शहरासह जिल्ह्यात दहिहंडी उत्साहात गोेविंदांनी फोडली. यावेळी गोविंदा, गोपालाचा जयघोष करण्यात आला. काही ठिकाणी दहिहंडी फोडण्यापुर्वी डीजेवर नृत्य करण्यात आले.

जेएसके ग्रुप व श्री अष्टविनायक मित्र मंडळ- धुळे येथील जेएसके ग्रुप व श्री अष्टविनायक मित्र मंडळातर्फे (बांबु गल्ली, गल्ली नं.४) येथे दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला. दहीहंडी उत्सवात मतिमंद शाळेचे विद्यार्थी व अंधशाळेचे विद्यार्थी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. लेझिम पथकाचाही समावेश होता.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर कोडगीर, नितीन वडनेरे, धनंजय दाभाडे, हेमंत गायकवाड, हेमंत जाधव, भरत बैरागी, गणेश खलाणे, विजय खैरे, शेखर मारे, चारुदत्त विसपुते, ऋषिकेश बापट, पवन माळी, विशाल खिवसरा, महेश थोरात, सचिन कापकर, प्रकाश चिंचोलिकर, संदीप कोडगीर, स्वप्निल जाधव, सौरभ बैरागी, अक्षय जाधव, शिरीष शर्मा, राज भावसार, दिनेश शिनकर, हरिष मोरे, संजय चिंचोलिकर, अनिल माळी, अमोल मराठे, मनोज शिरुड, पंकज खैरे आदींनी परिश्रम घेतले.

वाल्मिक नगर शाळेत- शिरपूर येथील आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळा वाल्मिक नगर येथे बाल गोपाल चिमुकल्यांनी गोकुळाष्टमी साजरी केली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायनेस क्लबच्या अध्यक्ष कविता बाविस्कर या होत्या. तर सरोज चावडा, सुनिता चौधरी, मुख्याध्यापिका क्रांती जाधव आदि उपस्थित होते.

राधाकृष्ण यांच्या जीवनावर आधारित सुंदर झाकी कृष्णलीला विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थित मान्यवरांचे व पालकांचे मने जिंकले तसेच त्यानंतर दहीहंडी चिमुकल्यांनी फोडली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय क्रांती जाधव, उपशिक्षक ए.बी. पाटील, रवी पवार, सौ.राजेश्वरी ढिवरे, राकेश शिरसाठ, श्रीमती स्वाती जगदाळे तसेच युवराज जाधव, प्रवीण पावरा यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.बी. पाटील यांनी तर कार्यक्रमाचे आभार रवि पवार यांनी मानले.

कुरखळी येथील जि.प. शाळा- कुरखळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी गोपाळकाल्याचे औचित्य साधत अक्षरकार्ड, शब्दकार्ड संख्याकार्ड, प्रश्नावली, चॉकलेटने भरलेली दहीहंडी फोडून अनोख्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला. पारंपरिक संस्कृतीचे जतन करत उत्सवाचा आनंद घेत ज्ञानार्जन करून उत्सव साजरा करण्यात आला. वेगळ्या पद्धत्तीने दहीहंडी साजरी केल्यामुळे विद्यार्थ्यांनीही चांगलीच मजा लुटली.

शाळेतील शिक्षिका योगिता नेरकर यांच्या कल्पनेतून व मुख्याध्यापक रघुनाथ गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी सावळदे केंद्रप्रमुख एम. बी. देवरे यांनी बालगोपालांना पाचशे रुपयाचे रोख बक्षीस देवून कौतूक केले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आत्माराम कोळी, शिक्षणतज्ज्ञ सदस्य पोपटराव शिरसाठ, जि.प.मराठी शाळेचे शिक्षक व सर्वांचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर माळी यांचेही सहकार्य लाभले.

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त चिमुकल्यांची दहीहंडी- धुळे येथील पर्ल्स ऑफ विज्डम् प्री स्कुलच्या चिमकुल्यांनी राधा-कृष्णावतार साकारुन कृष्ण जन्माष्टमीच्या सोहळ्यात गवळणीच्या मधुर संगीतावर राधा कृष्णांनी गरबा नृत्य केले. त्यानंतर सर्वांनी कृष्ण-गाथेतील व पवित्र गीतातील दोन दोन वाक्ये चिमुकल्यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रम शेवटी दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हर्षदा कुलकर्णी, प्रिती बागुल, नंदीनी बागुल, दिपाली विधाते आदिंनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!