Type to search

धुळे

शिवसेनेच्या माऊली संवादात १५०० महिलांशी चर्चा

Share

धुळे | शिवसेनेचा माऊली संवाद मोहिमेद्वारे कष्टकरी १५०० महिलांशी संवाद साधण्यात आला.

दि.२१ ऑगस्ट रोजी शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांचे जिल्ह्यात आगमन झाले ते माऊली संवाद मोहिमेत धुळे शहरात तसेच जिल्ह्यात कष्टकरी महिलांसोबत त्यांनी गप्पा मारल्या. त्यांची सुख- दु:ख जाणून घेतली.

यावेळी धुळे-नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात व महिला संपर्क संघटिका प्रियंकाताई घाणेकर उपस्थितीत होते. शिंदखेडा तालुक्यातील माळीच येथे सिद्धीविनायक ट्रस्टतर्ङ्गे दिलेल्या निधीतून बांधण्यात आलेल्या बांधर्‍यातील साठलेल्या जलाचे जलपुजन करण्यात आले.

धुळे शहरात सायंकाळी छत्रपती शाहू महाराज नाट्यगृह येथे १५०० महिलांशी माऊली संवाद मोहिमेद्वारे संवाद साधला. त्यानंतर धुळे तालुक्यातील आर्वी येथे कष्टकरी ग्रामीण महिलांसोबत देखील संवाद साधून दिलखुलास गप्पा मारल्या.

यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंके, माजी आमदार प्रा.शरद पाटील उपस्थित होतेे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!