Type to search

Breaking News धुळे मुख्य बातम्या राजकीय

भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी खा. डॉ. सुभाष भामरे यांची निवड

Share

धुळे । भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या. प्रदेश उपाध्यक्षपदी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळे लोकसभेचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मागील 5 वर्षाच्या खासदारकी आणि संरक्षण राज्यमंत्री या पदावर असतांना केलेल्या समाधानकारक कामगिरीनंतर डॉ. भामरे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदावर निवड झाली आहे. तसे पत्र आज प्रदेश कार्यालयातून कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीचे त्यांना प्राप्त झाले आहे. नियुक्ती बद्दल त्यांचे मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांनी कौतूक केले आहे. त्यांच्या निवडीची बातमी कळताच त्यांच्या 80 फुटी रोडवरील निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!