Type to search

Breaking News धुळे मुख्य बातम्या

धुळ्यात पांझरा नदीत दोन जण वाहिले

Share

धुळे । येथे पांझरा नदीत दोन जण आज वाहून गेले असून त्यांचा शोध एनडीआरएफ पथकामार्फत सुरू आहे. अद्याप दोघांचा शोध लागलेला नाही. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जितेंद्र सोनवणे यांनी दिली आहे.

शहरातील मोगलाई परिसरात असलेल्या फुले नगरात राहणारा अक्षय उर्फ तात्या गौतम सोनवणे (वय 22) हा युवक आज सकाळी अंत्ययात्रा आटोपून आला होता. यानंतर तो कुमारनगर भागाजवळील पांझरा नदी पात्रात आंघोळीसाठी गेला. पांझरा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाणी वेगाने वाहत असतांना अक्षयने नदी पात्रात उडी घेतली. परंतू पोहतांना त्याने पाण्यात गंटांगळ्या खाल्ल्या. काही वेळानंतर तो पाण्यात बेपत्ता झाला. हे प्रत्यक्षदर्शी पाहणार्‍यांच्या लक्षात आले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली. एनडीआरएफ पथक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जितेंद्र सोनवणे घटनास्थळी दाखल झाले. शोध मोहिम सुरू करण्यात आली. परंतू सायंकाळपर्यंत पथकाला अक्षयला शोधण्यास यश आले नाही.

तसेच धुळे शहरानजीक असलेल्या वरखेडी येथील विलास दादा मराठे हा देखील आज पांझरेत वाहून गेला. त्याचाही शोध पथकाकडून घेतला जात आहे. अद्याप त्याचाही शोध लागलेला नाही.

धोका पत्कारू नये
पांझरा नदी दुथडी वाहत असून नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत आहे. त्यामुळे पात्रात पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे कोणीही नदी पात्रात पोहण्यास उतरू नये. तसेच नदी पात्राजवळ सेल्फी काढू नये, असे आवाहन जिल्हा व पोलिस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!