एकविरा देवी मंदिरात 1305 बालकांचे जाऊळ

0
????????????????????????????????????
धुळे । खान्देश कुलस्वामिनी एकवीरा देवीच्या यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ झाला. चावदसनिमित्त मंदिरात मानमानता, नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी

झाली होती.आज मंदिर परिसरात 1305 बालकांचे जाऊळ काढण्यात आले.

मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासून कुळधर्म, कुलाचारासाठी मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी झाल्याने भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलला होता.

चैत्र महिन्यातील चावदसच्या दिवशी कुलस्वामिनी एकवीरा देवी मंदिरात जाऊळ काढण्याची परंपरा आहे. यंदाही धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, मुंबई, पुणे, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील भाविक एकवीरादेवी मंदिरात दाखल झाले होते. मंदिरात सकाळी एकवीरा देवीची महापूजा व आरती झाली.

LEAVE A REPLY

*