प.पू.चंद्रकांत मोेरे यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा

0
धुळे । श्री हरीहर प्राणप्रतिष्ठा सोहळा समितीतर्फे शहरातील गणपती मंदिराजवळ पांझरा नदी किनारी 23 फुट उंच व 18 टन वजणाच्या पंचधातूच्या शिवमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आजपासून सुरुवात झाली. या सोहळ्याला दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्राचे प.पू. गुरुमाऊली चंद्रकांत मोरे उपस्थित होते.

पांझरा नदीपात्रात 23 फुट शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा काशी (वाराणसी) येथील पुरोहितांच्या वैद्यक मंत्रोच्चाराने करण्यात आली. सकाळी संतोषी माता चौक ते झुलत्या पुलापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर प.पू. चंद्रकांत मोरे यांनी भाविकांशी हितगुज साधले. सायंकाळी त्र्यंबकेश्वर येथील श्री.निवृत्ती महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप संजय धोंडगे यांचे कीर्तन झाले. उद्या दि.18 रोजी दुपारी 4 वाजता समस्त वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, पंचक्रोशीतील वारकरी यांचा पावलीसह सामुहिक हरीपाठ होईल.

सायंकाळी 6 ते 8 या वेळेत हभप सोपान सानप (शास्त्री) हिंगोली यांचे कीर्तन होईल. रात्री 8 ते 10 या वेळेत पुणे येथील पांडूरंग पवार (तबला), गोविंद भिलारे (पखवाज), ज्ञानेश भोईर (हार्मोनियम) यांचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. दि.19 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत हभप मच्छिंद्र महाराज अहिरे वाडीभोकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

LEAVE A REPLY

*