Type to search

धुळे

जिल्ह्यात 18 मंडळांमध्ये अतिवृष्टी, दुबार पेरणीचे संकट टळले

Share

धुळे । जिल्ह्यात शनिवारी रात्री 18 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद महसूल विभागाकडे करण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे बहुतांश नदी-नाल्यांना पूर आले असून शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला. यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून राहिलेल्या पेरण्यांना लवकरच होतील असे जाणकार शेतकर्‍यांनी सांगितले.

रात्री वीज कोसळून दोन व्यक्ती व दोन गुरांचा मृत्यू झाला. नरडाणा येथे घराची भिंत कोसळली आहे त्यात वित्तहानी झाली असून प्राणहानी टळली आहे.

जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे (75 मि.मी.), वर्शी (72), बेटावद (90), नरडाणा (102), शेवाडे (75), धुळे तालुक्यातील धुळे (70 मि.मी.), सोनगीर (82), नगाव (90), कुसुंबा (96), नेर (110), मुकटी (80), बोरकुंड (128), पुरमेपाडा (146), खेडे (150), विंचूर (110), नवलनगर (74), साक्री तालुका – दुसाने (125 मि.मी.), दहीवेल 85) या गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर साक्रीत 57 मि.मी, कासारे 52, निजामपूर 31, दुसाने 125, म्हसदी 55, पिंपळनेर 46, ब्राह्मणवेल 55, उमरपाटा 41, कुडाशी 54, दहिवेल 85,तर एकूण तालुक्यात 60.1 मि.मी (141.6) पावसाची शासकीय नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात सर्वात जास्त पावसाची नोंद माळमाथा भागातील दुसाने परिसरात झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर जिल्ह्यात सक्रीय होता. साक्री तालुक्यातील रोहिणी, बुराई, शिंदखेडा तालुक्यातील केसर आदी नद्यांसह नाल्यांना मोठे पूर आले आहेत. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पिकांना मोठा दिलासा मिळाला. यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!