Type to search

धुळे

धुळ्यातील जुन्या सर्वोपचार रुग्णालयात सिटीस्कॅन मशिन दाखल

Share

धुळे । येथील जुन्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये सिटीस्कॅन मशिन दाखल झाले आहे. सुमारे 2 कोटी 71 लाख रुपये किंमतीचे सदर सिटीस्ॅकन मशिन आल्या मुळे धुळे शहरातील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची चांगली सोय झाली आहे. सदर सिटीस्कॅनची सुविधा जुन्या सिव्हील हॉस्पीटलला मिळणार असल्याची माहिती माजी आ. प्रा.शरद पाटील यांनी दिली आहे.

धुळे येथील जुने सर्वोपचार रुग्णालय 100 खाटांसह लवकर सुरु होत असून रुग्णालयाची दुरुस्ती पुर्ण झाली आहे. या रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी यापुर्वी 1 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला असून त्यातून रुग्णालयाची इमारत दुरुस्तीचे काम पुर्णत्वास आले आहे. तसेच रुग्णालयात विद्युतीकरणासाठी देखील निधी रुपये 90 लाखचा निधी उपलब्ध झाला होता तेही काम युद्धपातळीवर झाले आहे. शिवाय रुग्णालयासाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग यापुर्वीच मंजुर करुन घेण्यात आला आहे.

सदर जुन्या सिव्हील हॉस्पीटलच्या 100 खाटांच्या रुग्णालयासाठी लागणारे साहित्य सामुग्री, उपकरणे, उपलब्ध झाल्यानंतर रुग्णालय लवकरच सुरु करण्याचा रुग्णालय प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी 1 कोटी 57 लाख रुपयाच्या साहित्य सामुग्रीसाठी पाठपुरावा देखील सुरु होता.त्यास ना.एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. जुन्या हॉस्पीटलला सिटीस्कॅन मशिन मंजूर करण्यात आले आहे. याबाबत आवश्यक तो कर्मचारी वर्ग डॉक्टर्स पुरविण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकीत्सक व अधिष्ठाता हिरे वैद्यकीय महाविद्यालय यांची राहणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!