Type to search

धुळे राजकीय

नव महाराष्ट्र घडविण्यात साथ द्या- आदित्य ठाकरे

Share

धुळे । आपल्याला आता दुष्काळ मुक्त, बेरोजगारी मुक्त, प्रदुषण मुक्त असा नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी आपली साथ आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही साथ देणार का, नवीन महाराष्ट्र घडवायला तयार आहात का, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला उपस्थित जनसमुदानाने उभे राहुन प्रतिसाद दिला.

जन अर्शिवाद यात्रेनिमित्त युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे याचा विजय संकल्प मेळावा आज कृषी उत्पन्न बाजार समितीत झाला. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख खा. संजय राऊत, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, संपर्क प्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, महिला संघटक प्रियंका घाणेकर, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आ. शरद पाटील, प्रथम महापौर भगवान करनकाळ, हेमंत साळुंखे, महानगरप्रमुख संजय गुजराथी, न

रेंद्र परदेशी, अ‍ॅड. पंकज गोरे आदी उपस्थित होते.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, आपले सर्वांचे प्रेम पाहुन मन भरभरून आले. लोकसभा निवडणुकीत जनता शिवसेनेसोबत राहिली. त्याचे आभार मानण्यासाठी. व ज्यांनी विरोधात मतदान केले त्यांची मने जिंकण्यासाठी ही जन आर्शिवाद यात्रा काढली आहे. जिल्ह्यात दुष्काळ आहे. हा दुष्काळ वेगळा आहे. नुसती पाहणी करणे, फोटो काढणे म्हणजे पाहणी दौरा नव्हे. त्यासाठी काम करणे महत्वाचे आहे. शिवसेना नेहमीच शेतकर्‍यांसाठी काम करत राहील, असेही त्यांनी सांगितले.

शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी नव्हे तर शेतकर्‍यांची सरसकट कर्जमुक्ती करायची आहे. हे आपले स्वप्न आहे. जिल्ह्यात जर कोणाला कर्जमुक्ती किंवा पिक विम्याचा लाभ मिळाला नसेल, अशा शेतकर्‍यांसाठी मदत केंद्र सुरू करण्याबाबतही यावेळी आदित्य ठाकरे यांची सुचीत केले. आम्ही मुंबईत राहुन शेतकर्‍यांसाठी भांडतो. ही जन आशिर्वाद यात्रा निवडणुकीसाठी नव्हे तर तुमच्या समस्या जाणुन घेण्यासाठी आहे. ही यात्रा मी तिर्थयात्रा समजतो. धुळ्यातून जाणार्‍या कॅरीडॉरमध्ये भुमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी लढा देवू. येत्या पंधरा दिवसांत शहरातील शासकीय रूग्णालय सुरू होईल, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, धुळ्यातील शासकीय रूग्णालय लवकरच सुरू होईल. आदित्य ठाकरे सर्व सामान्याचे अश्रु पुसण्याचे काम करतात. याची महाराष्ट्र दखल घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात दुष्काळ आहे. पाऊस नाही, चारा नाही तरी आर्शिवाद देण्यासाठी जनतेचा महासागर उसळला आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात ताकद आहे. आम्ही मुंबईल शेतकर्‍यांसाठी लढत असतो. लाट फक्त मोदींची नाही तर ठाकरेंची देखील येत असते. केंद्रात तुम्ही तर महाराष्ट्रात आम्ही, हे आमचे ठरले आहे. धुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद उभी करायची आहे. शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी वेळेप्रसंगी शिवसेना सत्तेस असुनही रस्त्यावर उतरेल, असे खा. संजय राऊत यांनी मेळाव्यात बोलतांना सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!