Type to search

धुळे

युवासेनेची जन आशिर्वाद यात्रा १९ रोजी धुळ्यात

Share

धुळे | शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जन आशिर्वाद यात्रेला प्रारंभ केला असून त्याची सुरूवात उत्तर महाराष्ट्रातून झाली असून या यात्रेच्या माध्यमातून ज्यांनी मत दिले त्यांचे आभार मानण्यासाठी ज्यांनी मत नाही दिले त्यांची मन जिंकण्यासाठी आणि जनतेचे आशिर्वाद घेण्यासाठी या रथयात्रेची सुरूवात उत्तर महाराष्ट्रातून केली असून दि. १८ जुलै रोजी जळगाव येथे या यात्रेची सभेच्या माध्यमातून सुरूवात होणार असून रात्री या यात्रेचे धुळे जिल्ह्यात आगमन होणार असून रात्री शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दि.१८ रोजी धुळे येथे मुक्काम असून दि.१९ जुलै रोजी देवपूर येथील जयहिंद महाविद्यालयात सकाळी ११ वाजता युवासेना-शिवसेना आयोजीत विद्यार्थी संवाद कार्यक्रम होणार असून विद्यार्थ्यांशी आदित्य ठाकरे संवाद साधून विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना ते उत्तर देणार आहेत.

त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे ग्रामीण विधानसभेतील शेतकरी बांधव तसेच शिवसैेनीक पदाधिकार्‍यांना संबोधित करणार आहेत. ही यात्रा नाशिक जिल्ह्याकडे जाईल. जन संवाद यात्रेच्या जनजागृतीसाठी मतदार संघ निहाय शिवसेनेचे, युवासेनेचे सर्वच पदाधिकारी बैठका घेत असून त्यामध्ये शिवसेना जिल्हा शाखेची तसेच महानगर शाखेची,धुळे ग्रामीण शिवसेनेची तसेच युवासेनेच्या तालूका निहाय बैठका घेऊन जनसंवाद यात्रेसंबधात माहिती दिली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!