Type to search

धुळे

पावसासाठी शिवसेनेतर्फे महादेव मंदिरात अभिषेक

Share

धुळे । धुळे जिल्ह्यात जुलै महिना अर्धा उलटूनही पुरेसा पाऊस नाही म्हणून दि.15 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता फुलवाला खुंटाजवळील पुरातन गुप्तेश्वर महादेव मंदीरात विधीवत पुजाअर्चा व अभिषेक करुन महाआरती करण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व नद्या, नाले, धरणे, तलाव कोरडे पडलेले आहेत. जनावरांना चारा नाही, अक्कलपाडा धरण कोरडे असल्याने नकाणे तलाव व हरणमाळ तलावातील पाणी संपलेले आहे. त्यामुळे धुळे शहरावर पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. यासाठी पावसासाठी साकडे घालण्यासाठी महादेवाच्या मंदिरात अभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमास सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, माजी आ. प्रा.शरद पाटील, धिरज पाटील, महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, राजेंद्र पाटील, विजय भट्टड, डॉ.सुशिल महाजन, रवि काकड, गुलाब माळी, संदीप सुर्यवंशी, भरत मोरे, कैलास मराठे,ललित गंगाधर माळी, रामदास कानकाटे, केशव माळी, भटू गवळी, अविनाश थोरात, महादू गवळी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!