Type to search

धुळे

जळगाव घरकूल प्रकरणाचे 1 ऑगस्ट रोजी कामकाज

Share

धुळे । जळगाव घरकूल प्रकरणाचे पुढील कामकाज आता 1 ऑगस्ट रोजी होणार असून त्या दिवशी निकाल लागण्याची शक्यता आहे. आज देखील या प्रकरणाचा निकाल अपेक्षित होता, त्यामुळे न्यायालयात गर्दी झाली होती. चोख पोलिस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता.

जळगाव घरकुल प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे. प्रकरणाचे कामकाज विशेष न्यायाधीश डॉ़ सृष्टी नीळकंठ यांच्या समोर सुरू आहे. त्यांनी सुरुवातीला सर्व संशयित आरोपींची हजेरी घेतली़ माजी मंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर, जगन्नाथ वाणी, प्रदीप रायसोनी, राजेंद्र मयुर आदींसह सर्व 48 संशयित आरोपी यावेळी हजर होते. त्यानंतर न्यायाधीश सृष्टी निळकंठ यांनी 1 ऑगस्ट ही पुढची तारीख दिली. आता त्या दिवशीच निकाल लागण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!