Type to search

धुळे

हिंदुत्ववादी संघटनांतर्फे धुळ्यात मोर्चा

Share

धुळे । हिंदू देवी-देवतांच्या बदनामीसह गोरक्षकांवर हल्ले करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी धुळे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमुळे कोट्यावधींचे व्यवहार टप्प झाले. तर सकाळी हिंदुत्ववादी संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. आग्रारोडवरील श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात येऊन मोर्चाची सांगता झाली.

देवतांची बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच यापूर्वी गोरक्षकांवर हल्ला करण्यात आला होता. या सर्व घटनांमुळे तरुण वर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे. पोलिसांकडून विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर दबाव टाकणे, गुन्हे दाखल करणे आदी प्रकार करून दडपशाही केली जात आहे. रविवारी झालेल्या बैठकीत शहर बंदची हाक देण्यात आली होती़

सकाळी 10 वाजता मनोहर चित्रमंदीर समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शांततेत मोर्चाला सुरूवात झाली. आग्रा रोडमार्गे मोर्चा पाच कंदील चौकात धडकला. याठिकाणी सामुहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आली. सामुहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर श्रीराम मंदीराजवळ मोर्चा धडकला. त्यानंतर श्रीराम मंदीरात महाआरती करण्यात आली व मोर्चाचा समारोप झाला.

शहरातील आग्रारोड, मुख्य बाजार पेठ, पाचकंदील, देवपुर व कुमार नगरातील व्यापार्‍यांनी दुकाने, व्यवसाय बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दिला.

मोर्चात भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, राष्ट्रवादीचे कैलास चौधरी, भाजपाचे मनोज मोरे, प्रदीप जाधव, पंकज बागुल, विक्की परदेशी, भिकन वराडे, रवी बेलपाठक, हिरामण गवळी, संगीत अग्रवाल, राजु महाराज, प्रशांत बागुल, देवेंद्र पाटील, हेमचंद्र चौधरी, युवराज हटकर, नंदु सोनार, राकेश कुलेवार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, डॉ.माधुरी बाफना, कल्पना गंगवाल, निशा पाटील, उमेश चौधरी, प्रभादेवी परदेशी, बंटी मासुळे आदिंसह हिंदुत्ववादी संघटनेचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!