Type to search

धुळे

कॅन्टीनमधील चोरीचा गुन्हा उघडकीस

Share

धुळे । शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कॅन्टीनमधील चोरीचा गुन्हा 48 तासातच उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आले. पोलिसांनी शहरातून एकाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.

हिरे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील कॅन्टीमध्ये दि. 23 रोजी पहाटे अज्ञात चोरट्याने घुसून एक सोन्याचे मंगळसुत्र, दोन मोबाईल, चॉकलेट व कॉस्मेटीक साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने घटनास्थळवरील सीसीटीव्हीच्या आधारावरून चोरट्याची माहिती काढली. सापळा लावून शिताफीने जाबीर शहा (रा. वडजाई रोड, धुळे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी 13 हजार 500 रूपये किंमतीचा एक मोबाईल, एक हजार 500 रूपयांचा एक मोबाईल, 30 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, रोख पैसे व कॉस्मेटीक साहित्य हस्तगत केले आहे.

ही कामगिरी पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे, अपर पोलिस अधिक्षक राजु भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक अनिल पाटील, पोहेकाँ रफिक पठाण, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, पोकाँ राहुल सानप, कुणाल पानपाटील, अशोक पाटील, उमेश पाटील, विलाास पाटील, मयुर पाटील, तुषारी पारधी, रवी राठोड यांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!