Type to search

Breaking News धुळे मुख्य बातम्या

तंबाखूमुक्त शाळांचा धुळे जिल्हा घोषित होणार!

Share

धुळे । तंबाखूमुक्त शाळा अभियानात धुळे जिल्ह्याने उत्तर महाराष्ट्रात झेप घेतली असून राज्यातील चौथा जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्याने भरारी घेतली आहे. धुळे,शिंदखेडा,शिरपूर आणि साक्री तालुक्याने विशेष योगदान दिले आहे. तंबाखूमुक्त चळवळ प्रभावी होण्यासाठी शिक्षण विभाग,स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. धुळे जिल्हा तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा लवकरच घोषित होणार असून सर्व तालुक्यांतील शाळांनी निकष परिपूर्ण अपलोड करून आघाडी घेतली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी. यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकार्‍यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील नव्या पिढीत व्यसनविरोधी संस्कारासाठी तंबाखूमुक्त शाळा अभियान यशस्वी होत आहे.

गटशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तंबाखूमुक्त शाळा मोहीम प्रभावीपणे जिल्ह्यात राबविण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शन तत्वानुसार जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त जाहीर करण्यासाठी आवश्यक 11 निकषांची पूर्तता पुराव्यासह अपलोड करण्यात आली. शिक्षण विभाग व फाऊंडेशन यांच्या सहकार्याने उल्लेखनीय कामगिरी शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुख, त्रयस्थ संस्था, स्वयंसेवी संस्था यांनी विशेष प्रयत्न केले. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणार्‍या विविध आजारामुळे जगभरात दरवर्षी सुमारे साठ लाखाच्या आसपास लोक मृत्यूमुखी पडत आहेत, त्यापैकी आपल्या देशात सुमारे दहा लाख लोकांना जीवाला मुकावे लागते. त्यामुळे होणार्‍या दुष्परिणामामुळे जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे काळाची गरज ओळखून उपक्रम प्रभावीपणे राबविले गेलेले आहे. तंबाखूमुळे आरोग्यावर होणारे दुष्पपरिणाम आणि उपाययोजना यावर जनजागृती धुळे जिल्ह्यात शाळांनी खूपच चांगल्याप्रकारे केली. तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती व त्याविषयी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात करण्यात आली. मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख, शिक्षक, उपक्रमशील शिक्षक यांचे सहकार्य घेऊन शाळा, शालेय विद्यार्थी,शिक्षक यांना तंबाखूमुळे आरोग्यावर होणारा दुष्परिणामाविषयी प्रशिक्षण देण्यात येऊन प्रत्येक शाळांचे निकष अभ्यासपूर्वक पुराव्यासह कसे अपलोड करावे यावर मार्गदर्शन करण्यात आले व प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी करावी यादृष्टीने व्यापक पातळीवर कार्यशाळा, चर्चासत्रे,बैठका,स्पर्धा,पोस्टर्स प्रदर्शन द्वारे प्रबोधन करण्यात आले.

तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी कशी करावी शाळेच्या 11 यार्ड परिघात तंबाखू उत्पादने विक्रीस बंदी करणे, मुख्य प्रवेशद्वारासमोर एक फलक लावून येथे तंबाखू सेवन व विक्रीस बंदी आहे असे लिहणे, तंबाखू उत्पादनाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिराती शाळांमध्ये करणे मनाई आहे. तंबाखूमुक्त शाळा अभियान शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाऊंडेशन यांची टीम, जिल्ह्यातील समन्वयक यांच्या सहकार्याने यशस्वी झाले. गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते,प्राध्यापक सर्व तालुक्यात मनापासून तंबाखूमुक्त शाळेचे अभियान स्वत:चे मानून काम करणारे जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक, शहर समन्वयक, त्रयस्थ संस्था यांना जो फलदायी व प्रबोधन, यशस्वी अनुभव या अभियानात आला असेल तो प्रत्यक्षात यावा यासाठी हा यशोगाथा लिहिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ज्यातून खर्‍या अर्थाने अभियानाचा परिणाम झाला असेल तो अतिशय कमी ओळीत यशोगाथा लिहून पाठवावीत, सदर यशोगाथा या सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या ईमेलवर पाठवा किवा ग्रुपवर पाठवा या यशोगाथा धुळे जिल्ह्यातील यशोगाथा या पुस्तकात प्रकाशित होतील. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन डॉ.सतीश पाटील, जिल्हा समन्वयक पंकज शिंदे, राजेंद्र माळी, पवन शंकपाळ, अक्षय पाटील, मोहन पाटील, भटू राजपूत, नारायण गिरासे, निशांत पाटील व समन्वयक संस्था व कार्यकर्त्यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!