Type to search

धुळे

46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Share

धुळे । लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत 46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. संबंधित विभागांनी या सेवांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

या कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक विभागाकडून दिल्या जाणार्‍या सेवेच्या कालावधीची माहिती संबंधित कार्यालय प्रमुखाने दर्शनी भागात नागरिकांना सहजपणे दिसतील, अशा पध्दतीने फलकावर लावावी. या योजनांचा लाभ घेण्यासाठी मध्यस्थ, दलाल आर्थिक मागणी करीत असतील, तर नागरिकांनी तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा. आपले सरकार सेवा केंद्रावर आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज दाखल करुन डिजिटल स्वाक्षरीद्वारे वितरीत होणारे दाखले प्राप्त करुन घ्यावेत. डिजिटल स्वाक्षरीचे दाखल शासनमान्य आहेत. तसेच शासनाने या कामी अपिलाची तरतूद उपलब्ध करुन दिली असून आवश्यक असल्यास संबंधित विभागाच्या अपिलीय अधिकार्‍याकडे ऑनलाइन अपील दाखल करावे.

महसूल विभागाद्वारे दिल्या जाणार्‍या सेवा व सेवा देण्याचा कालावधी असा (लोकसेवेचा तपशील व लोकसेवेची कालमर्यादा (दिवस) या क्रमाने) : वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र 15, जातीचे प्रमाणपत्र- 45, उत्पन्न प्रमाणपत्र 15, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र- 21, तात्पुरते रहिवास प्रमाणपत्र- 7, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र- 7, ऐपतीचा दाखला- 21, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना 7, अधिकार अभिलेखाचे प्रमाणपत्र- 7, अल्पभूधारक दाखला, भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला, शेतकरी असल्याचा दाखला- 15, डोंगर, दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र-7, प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे- 1, प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र देणे, प्रकल्पग्रस्तांच्या वारसदारास प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरीत करणे- 30 दिवस.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!