Type to search

धुळे

आरोग्य, सौंदर्य व समृद्धीसाठी स्वच्छता आवश्यक

Share

धुळे । आरोग्य, सौंदर्य व समृध्दीसाठी स्वच्छता आवश्यक आहे. असा कानमंत्र स्वच्छतेचे राष्ट्रीय ब्रँड अँबेसेडर प.पू. रमेशभाई ओझा यांनी धुळेकरांना दिला.

येथील महापालिकेच्या नूतन इमारतीच्या प्रांगणात प.पू.ओझा यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, स्थायीसमितीचे सभापती युवराज पाटील आदी उपस्थित होते.

पुढे विचार मांडतांना प.पू.ओझा म्हणाले की, स्वर्गामध्ये आरोग्य सुव्यस्थीत असून अमृताच्या नद्या वाहतात. तेथे वृध्दत्व कोणाला येत नाही. मानव हा श्रेष्ठ आदर्श जीवनासाठी जी कल्पना करतो तो म्हणजे स्वर्ग होय. स्वर्ग म्हणजेच स्वच्छता. त्यामुळे स्वच्छता करणे आवश्यक असते. चांगले आरोग्य हेच मोठे सुख आहे. कितीही धनसंपत्ती असली तरी पण आरोग्य चांगले नसेल तर काय उपयोग? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आमचा देश देखील सशक्त आहे. सौंदर्य सर्वानाच हवे आहे. आपले घर, शरीर, वस्त्र, नगर, परिसर, जिल्हा, राज्य, राष्ट्र सुंदर असावे असे सर्वांना वाटते. शहरालगत हिरवळ असावी, बागबगीचे, नद्या असाव्यात हे सर्व शक्य होवू शकते. परंतु ते केवळ स्वच्छतेमुळे. स्वच्छतेमुळेच सौंदर्य मिळेल, आरोग्य मिळेल, स्वच्छता असेल तरच आरोग्य टिकते असे त्यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!