Type to search

धुळे

जलसंवर्धनासाठी ग्रामसभा घ्या- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Share

धुळे । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामपंचायत सरपंचांना लिहिलेल्या पत्रानुसार जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे आयोजन करुन जलसंवर्धनासाठी उपक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

पंतप्रधान श्री. मोदी यांनी पत्रात म्हटले आहे, पावसाचे लवकरच आगमन होईल. आपल्या देशाला निसर्गाने पुरेसे पावसाचे पाणी दिले आहे. निसर्गाच्या या देणगीचा आपण सर्वांनी आदर करणे आपले कर्तव्य आहे. पावसाळा सुरू होताच पावसाचे पाणी संकलनासाठी शेताची बांधबंदिस्ती, नदी व ओढ्यात चेक डॅम तयार करुन तटबंदी करावी. तलावांचे खोलीकरण व सफाई करावी. वृक्षारोपण करावे. पावसाच्या पाण्याचे संचय झाल्यास अन्नधान्याचे उत्पादन वाढेल. त्याबरोबरच पाण्याचा मोठा साठा निर्माण होवून आपल्याला गावातील अनेक कामांसाठी या पाण्याचा उपयोग करता येईल. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सरपंचांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार 20 व 21 जून रोजी ग्रामसभांचे आयोजन करुन गावतळ्यांचे बांधकाम व स्वच्छता, वृक्षारोपण, राहत्या घराजवळ तसेच सामूहिक ठिकाणाजवळ पावसाचे पाणी साठविण्यासाठी कार्यवाही करावी. तसेच घराजवळील शोषखड्डे तसेच शेतात भूजल पुनर्भरणाचा उपक्रम राबवावा. जलसंवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जाणीव जागृतीसाठी रॅलीचे आयोजन करावे. रेन वॉटर हॉर्वेस्टिंगबाबत जनजागृतीसाठी एकांकिका, नाटक, गीत, नृत्य गीतांचे कार्यक्रम ग्रामपंचायत व शालेय पातळीवर आयोजित करावेत.

जलसंवर्धन आणि पाण्याचा योग्य वापर याविषयीचे संदेश, चित्रांचे सार्वजनिक भिंतीवर रेखाटन करावेत. तसेच ग्रामसभेसाठी एक अधिकारी व कर्मचार्‍यांना ग्रामसभेस उपस्थित राहण्यासाठी नियुक्त करावेत, असेही सुचना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!