Type to search

धुळे

खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात 351 किलो आंब्यांचा भोग

Share

धुळे । खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात वटपौर्णिमेनिमित्त आज देवीला 351 किलो आंब्यांचा भोग लावण्यात आला. व मंदीर परिसरात देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. वटपौर्णिमेनिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

खान्देश कुलस्वामीनी एकवीरा देवीला वटसावित्री पौर्णिमानिमित्त तीनशे एक्कावन्न किलो आंब्यांचा आम्रशृंगार करण्यात आला. सकाळी 6 वाजता देवीची आरती होवून पुजा, पाठ, अभिषेक करण्यात आला. त्यानंतर एकवीरा देवीला आम्रशृंगार करण्यात आला. सकाळी 11.30 वाजता महानैवेद्य दाखवून महाआरती झाली. सायंकाळी 7 वाजता आरती होवून नंतर मंदीर परिसरात देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले. वटपौर्णिमेनिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

दि.19 जून रोजी हभप मेघश्याम महाराज मठाधिपती शिंदखेडा यांच्या पायी दिंडीचे आगमन श्री. एकविरा देवी मंदिरात होणार आहे. दिडींचे सकाळी 8 वाजता आगमन होईल तरी भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव, मधुकर गुरव, कार्यकारी अध्यक्ष मनोहर गुरव यांनी केले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!