Type to search

धुळे

धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल

Share

दोंडाईचा । राज्य शासनाने वर्षभरापासून ग्रामीण भागातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांची ग्राम विद्युत सेवक नेमणूक करून गावातील समस्या तात्काळ सुटण्यासाठी हा निर्णय घेतला होता मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात झालेली दिसून येत नाही त्यामुळे ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरावीत अशा सूचना राज्याचे रोहयो, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, व औषध प्रशासन खात्याचे मंत्री ना जयकुमार रावल यांनी दिल्या आहेत.

दोंडाईचा येथील कार्यालयात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विजेच्या समस्येवर उच्च स्तरीय अधिकार्‍यांची बैठक ना. जयकुमार रावल यांनी घेतली होती तीत मुख्य अभियंता राजेश चव्हाण, धुळ्याचे अधीक्षक अभियंता पी एन पौनीकर, नंदुरबारचे अधीक्षक अभियंता राजेश चव्हाण, जळगाव पायाभूत आराखडा अधीक्षक अभियंता श्री. मानकर, दोंडाईचा विभागाचे कार्यकारी अभियंता ललित ठाकूर आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी ना. जयकुमार रावल यांनी दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण विद्यूतीकरण, एकात्मिक वीज वितरण प्रणाली योजना, सौभाग्य योजनांचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना विविध सूचना केल्या.

यावेळी ना.रावल म्हणाले की, सोलर कृषी पंपासाठी आम्ही मंत्रालयात भांडून अधिकचा लाभ दोन्ही जिल्ह्यातील शेतकर्‍यांना जास्त मिळावा म्हणून मंजूर करून घेतले आहेत त्याबाबत पाठपुरावा कमी पडता कामा नये, तापी नदीच्या काठावर पाणी उपलब्ध असतांना केवळ विजेअभावी शेतकर्‍यांच्या समस्या आहेत त्या तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, नादुरुस्त रोहित्र वाहतूक खर्च शेतकर्‍यांच्या मार्फत करण्यात येत असतो तसे आढळून आल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशा सूचना ना.जयकुमार रावल यांनी यावेळी दिल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!