Type to search

धुळे

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनश्रेणी व निवृत्ती वेतनासाठी् अधिवेशनात प्रश्न मांडणार – आ.कुणाल पाटील

Share

धुळे । गाव विकासात महत्वाचा घटक असणार्‍या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना नियमित कर्मचार्‍यांप्रमाणे वेतनश्रेणी आणि निवृत्ती वेतन लागू करण्यासाठी आणि ग्रामपंचायत कर्मचार्‍यांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विधानभवनात आवाज उठविणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन धुळे जिल्हा शाखेच्या पदाधिकार्‍यांना दिले.

धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या पदाधिकार्‍यांनी आ.कुणाल पाटील यांची भेट घेवून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले, निवेदनात म्हटले आहे की, गावाच्या विकासात सरपंच, ग्रामसेवक आणि त्यांच्या सोबत काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा असतो.प्रत्येक ग्रामपंचातीत लिपीक, शिपाई, वॉटरमन, सफाई कर्मचारी या पदांवर कर्मचारी काम करीत असतात ग्रामंचायतीच्या उत्पन्नानुसार त्यांना पगार दिला जातो. मात्र ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना अल्पसे उत्पन्न असल्याने त्यांना पगारही कमी मिळत असतो. राज्यात एकूण 27 हजार 920 ग्रामपंचायती आहेत.

त्यात सुमारे 60 कर्मचारी कार्यरत आहेत. आपल्या मागण्यांसाठी सदर कर्मचारी गेल्या वीस वषार्ंपासून लढा देत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.रायगड यांच्या अध्यक्षतेखाली सन 2017 मध्ये समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे. सदर अहवाल तपासून ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना अद्यापन वेतनश्रेणी लागू करण्याबाबत निर्णय झालेला नाही. तसेच निवृत्ती वेतनाबाबतही समिती गठीत झाली होती मात्र याबाबतही शासन कोणताच निर्णय घेत नसल्याचे पदाधिकार्‍यांनी आ.कुणाल पाटील यांच्याशी चर्चा करतांना सांगितले. दरम्यान ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या मागण्या ह्या रास्त असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे,

ग्रामस्थांच्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी सदर कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात. त्यामुळे त्यांना नियमित कर्मर्‍यांप्रमाणे वेतन आणि निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे. यासाठी सुरु होणार्‍या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला आ.कुणाल पाटील यांनी दिले.

ग्रामपंचायत युनियन शिष्टमंडळात अध्यक्ष श्रीकांत जाधव, जयवंत पाटील, प्रफ्फुल भामरे, अनिल इंदाईज, गोरख पाटील, तुकाराम चव्हाण, पुंडलिक कोळी, बारकु शिंदे, संजय पाटील, किरण पाटील यांचा समावेश होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!