Type to search

धुळे

नगर-पुणे महामार्गावर अपघातात धुळ्याचे तिघे ठार, एक गंभीर जखमी

Share

पारनेर । नगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द शिवारातील हॉटेल स्वराली व हॉटेल संजीवनी यांचे मधील पुलाजवळ पळवे खुर्द येथे मंगळवार 11 जून रोजी पहाटे 4.30 च्या सुमारास स्कॉर्पिओला भीषण अपघात झाला. या अपघातात धुळ्यातील तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला जवळील रुग्णायात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमधील सर्वच व्यक्ती हे धुळ्याचे रहिवाशी आहेत.

जुनेर अहमंद हजी महंमद (वय 20, धंदा पीओपी काम, रा. मछली बाजार कसाबवाडा, धुळे) यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणेकडून नगरकडे जाणार्‍या रोडवर जातेगाव फाट्याजवऴ उभ्या असणार्‍या ट्रक एमएच 22 एए 524 वर पाठिमागून आलेल्या स्कार्पिओ नंबर एमएच 18 एजे8443 या गाडीने जोराची धडक दिली. हाटेच्या सुमारास झोपेत चालकाचे गाडीवरल नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात तीन जण ठार झाले व एक जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्यासह पोलीसांनी धाव घेतली.

जखमींना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवले आहे. ओझायर तसनीय अख्तर अन्सारी (वय-30 रा. फिरदोसनगर, धुळे), फैसल गुलाब रब्बाली अन्सारी (वय-20 रा. मछली बाजार, धुळे) इरफान शयशोदोहा अन्सारी (वय-20 रा. मछली बाजार, धुळे) अशी मृतांची नावे आहेत. अदनान निहाल अन्सारी (वय-21 रा. तिरंगा चौक धुळे) हा गंभीर जखमी आहे. पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संजयकुमार सोने हे करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!