Type to search

maharashtra धुळे मुख्य बातम्या

धुळ्यातील घटना : तरुणाची अंत्ययात्रा पोलीस ठाण्यात!

Share
धुळे । देवपुरातील मोचीवाड्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत नातेवाईकांकडून घातपाताचा संशय व्यक्त होत असून त्याचा खुनच झाला असावा, असा कयास व्यक्त होत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी आज सकाळी घटनास्थळी जावून पाहणी केली. याप्रकरणी देवपूर पोलिसात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सतिष किसनलाल धुर्मेकर (वय 35 रा. विष्णूनगर, देवपूर, धुळे) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो महाशिवरात्रीच्या रात्री भतवाल चित्रमंदिराजवळील कीर्तनाला गेला होता. मात्र पहाटे 5 वाजेच्या सुमारास तो लहान पुलालगतच्या रस्त्यावर देशी दुकानाबाहेर गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसून आला. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झालेली होती. तसेच त्याचे हातपाय देखील बांधलेले होते. माहिती मिळताच कुटुंबियांनी उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. पंरतू त्याची प्रकृती आणखीनच खालावल्याने त्याला नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. सतिषच्या मृत्यूची माहिती कळताच नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती.

घटनास्थळी पाहणी, दोघांची चौकशी
घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे निरिक्षक दिलीप गांगुडे, सहा.पोलीस निरिक्षक पटेल यांनी सतिष धुर्मकर याच्या मोचीवाड्यातील घरी जाऊन अधिकची माहिती घेतली. तसेच घटनास्थळी जावून पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी मयत सतिषच्या दोन मित्रांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीही केल्याचे समजते.

देशी दारु दुकानाची तोडफोड
देवपूरातील विष्णु नगरातील सतिष धुर्मेकर या तरूणांच्या मृत्यूनंतर सायंकाळी काही जणांनी याच नगरातील देशी दारूच्या दुकानाची तोडफोड केली. दुकानातील दारूच्या बाटल्या, साहित्यही तोडफोड करून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलो. माहिती मिळातच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, निरीक्षक दिलीप गांगुर्डे हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

माझ्या मृत्यूला न्याय पाहिजे….
सतिष गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्यावरून नातेवाईंनी घातपातचा संशय व्यक्त केला. तसेच सतिषची अंत्ययात्रा नेत असतांना ती देवपूर पोलिस ठाण्यासमोरच उभी केली. संतप्त नातेवाईकांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली. अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी नातेवाईकांची समजूत काढली. अमररथावर सतिषचे छायाचित्र असलेला बॅनर लावण्यात आला होता. त्यावर माझा मृत्यूला न्याय पाहिजे, माझ्या मुलांना न्याय पाहिजे, असा उल्लेख करण्यात आलेला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!