Type to search

धुळे आणि नंदुरबारची जबाबदारी यशस्वी पार पाडल्याबद्दल ना.रावल यांचा सत्कार

धुळे

धुळे आणि नंदुरबारची जबाबदारी यशस्वी पार पाडल्याबद्दल ना.रावल यांचा सत्कार

Share

दोंडाईचा । राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्यावर उत्तर महाराष्ट्राची संपूर्ण जबाबदारी पक्षाने दिल्यामुळे त्यांनी धुळे आणि नंदुरबार लोकसभेची जबाबदारी ना.महाजन यांनी राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे दिली होती ती यशस्वीरीत्या पार पाडून भरघोस मतांनी विजयश्री खेचून आणल्याबद्दल ना.गिरीश महाजन यांनी ना.जयकुमार रावल यांचा सत्कार केला.

धुळे लोकसभा आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा डोळा होता. त्यासाठी काँग्रेसने फार मोठी ताकद देखील लावली होती स्थानिक परिस्थितीची उत्तम जाण असलेले ना.जयकुमार रावल यांना या जागा जिंकून आणण्यासाठी जबाबदारी देण्यात आली होती. ती त्यांनी अतिशय उत्तमप्रकारे नियोजन करून जिंकून आणली शिवाय धुळे लोकसभा मतदारसंघात मताधिक्य देखील वाढविले. नरेंद्र मोदींच्या सुप्त लाटेचा लाभ आणि योग्य नियोजनाच्या बळावर दोन्ही जागा जिंकून यशस्वी झाल्याने मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ना.रावल यांचे कौतुक केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!