Type to search

maharashtra धुळे नंदुरबार फिचर्स

भाजप-काँग्रेसमध्ये रंगणार सामना

Share

धुळे, नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी

 

शिरपूर – धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकी साठी भारतीय जनता पक्षातर्फे अमरिशभाई पटेल हे उमेदवारी अर्ज दि.12 मार्च रोजी दुपारी 12.45 मिनिटांनी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अर्ज भरण्यात येणार असून यावेळी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी केले आहे.

नंदुरबार – धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ निवडणूकीसाठी काँग्रेसतर्फे विद्यमान जि.प.बांधकाम सभापती अभिजीत मोतीलाल पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. उद्या दि. 12 रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याशिवाय तळोद्याचे माजी नगराध्यक्ष भरत माळी, धुळे येथील श्यामकांत सनेर हेदेखील शर्यतीत आहे. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उद्या दि.12 रोजी उमेदवारी दाखल करण्याची अंतीम मुदत आहे. भाजपाकडून शिरपूचे माजी आ.अमरिशभाई पटेल यांची उमेदवारी निश्चित आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराबाबत आज मुंबईत पक्षाच्या राज्य कोअर कमिटीची बैठक बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ना.अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्यासह कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत काँग्रेसतर्फे विद्यमान जि.प.सभापती अभिजीत मोतीलाल पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. उद्या दि.12 रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याशिवाय तळोदा येथील माजी नगराध्यक्ष भरत बबनराव माळी व धुळे येथील श्यामकांत सनेर हेदेखील काँग्र्रेेसतर्फे शर्यतीत आहेत. त्यामुळे काँग्रेसतर्फेे कोणाला उमेदवारी मिळते हे माघारीनंतर स्पष्ट होणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!