धुळ्यात पूर्ववैमनस्यातून बाप-लेकाचा खून : एक जखमी

0
धुळे । शहरातील देवपूरातील वानखेडे नगरात आज सायंकाळी एका टोळक्याने सशस्त्र हल्ल्या करून बाप – लेकाचा खून केला. तर अन्य एक जण जखमी झाला आहे. रावसाहेब उर्फ रावशा दगाजी पाटील व त्याचा मुलगा वैभव पाटील अशी दोघा मृतांची नावे आहे. हल्ल्यात एक गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान घटनेमुळे शहरातील काही भागात तणाव सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

देवपूरातील वानखेडे नगरात आज सायंकाळी काहींनी तलवाल, चॉपर व धारदार शस्त्रांनी रावसाहेब पाटील, वैभव पाटील (रा. देवपूर) व त्याच्या सोबत असलेल्या एकावर हल्ला केला. त्यात एक जण गंभीर जखमी झाले. त्याला तत्काळ शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रूग्णालयात व परिसरात एकच गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, देवपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्ता पवार, देवपूर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सविता भांड या फौजफाट्यासह दाखल झाल्या.

उपचार सुरू असतांना वैभव पाटील व रावसाहेब पाटील या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांसह मित्र परिवाने एकाच आक्रोश केला. दरम्यान या घटनेमुळे शहरातील काही भागात तणाव सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान मृत वैभवचे काही दिवसांपुर्वीचे लग्न झाले होते. या घटनेमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

मारेकर्‍याला पारोळा येथे अटक
धुळे-देवपूर भागात वानखेडे नगरात रावसाहेब दगाजी पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील यांचा खून करुन मारेकरी हा ट्रकमधून पसार होत होता. तो रात्री पारोळा पोलीस स्टेशनसमोर ट्रकमधून उतरला. तो रक्तबंबाळ अवस्थेत दिसल्याने जागरुकता दाखवित पारोळा पोलीस स्टेशनचे काशिनाथ पाटील, दीपक अहिरे यांनी त्यास विचारपूस केली. यावेळी पो.उ.नि.सुधाकर लहारे, प्रदीप पाटील, नरेंद्र पाटील, राहुल पाटील, सुनील पवार, नाना पवार, सागर कासार यांनी त्याला विचारले असता तो उडवा-उडवीची उत्तरे देत होता.

भांडण झाल्याचे तो सांगत असतांना त्याची बोटे व कान कापलेले दिसून आले. तो घाबरलेल्या अवस्थेत असल्याने पारोळा पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन धुळे येथे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला त्यावेळी रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील यांचा खून झाल्याची घटना समजल्यानंतर जयराम शामकांत पाटील (वय 25, रा.बोरसे नगर, प्लॉट नं.12, देवपूर-धुळे) यास ताब्यात घेवून उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले.

यानंतर तातडीने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार घन:श्याम मोरे, मुक्तार शेख, पिंटू पवार, मुकूंद पाटील यांनी पोलीस बंदोबस्तात त्याच्यावर उपचार करुन घेतले. यानंतर धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही पारोळा येथे दाखल झाले. त्यास ताब्यात घेऊन अटक करण्याची कारवाई सुरु होती. पारेाळा पोलिसांनी दाखविलेल्या जागरुकतेमुळे त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

*