दोंडाईचा येथील गुन्ह्याचा तपास लावा -शानाभाऊ सोनवणे

0
धुळे । दि. 2 । प्रतिनिधी-दोंडाईचा येथील हॉटेल शिवनेरीजवळ सत्यम राजपूत यांचा 2016 मध्ये मृतदेह आढळून आला. याबाबत दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्यापही याबाबत पोलिसांकडून तपासात यश आले नाही.
तरी या घटनेचा तात्काळ तपास करावा, असे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी पोलिस अधीक्षक एम.रामकुमार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, दोंडाईचा येथील सत्यम महेंद्रसिंग राजपूत याचा कनोरी नाल्याखाली मृतदेह आढळून आला होता.

या घटनेला सात महिन्यापेक्षा जास्त कालावधी होवूनदेखील सत्यम राजपूत याच्या मृतदेहाचे गुढ गुलदस्त्यात असून या घटनेतील बजाज पल्सर वाहन क्र.एमएच18 एटी 1522 ही दुचाकी गुन्ह्यातील महत्वाचा पुरावा म्हणून दोंडाईचा पोलिस ठाण्यात होती. मात्र या दुचाकीची येथील अधिकार्‍यांनी विक्री करुन विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

या गुन्ह्यातील बजाज पल्सर वाहन क्र. एमएच18 एटी 1522 ही दुचाकी दोंडाईचा येथील व्यक्तीला विकण्यात आली आहे. मोटार सायकलीचे स्वरुप बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर दुचाकी मयत सत्यम राजपूत यांचे भाऊ चेतन राजपूत यांनी सदरील दुचाकीचे आरटीओ इन्स्पेक्शन होवून गाडी ताब्यात मिळावी याबाबत तपासणी अंमलदार मोरे यांना सांगितले.

त्यांनी सदरील गाडी पोलिस स्टेशन आवारातून गहाळ झाल्याचे सांगितले. तरी सत्यम राजपूत यांचा गुढ मृत्यूचा तपास तात्काळ करावा व गुन्ह्यातील पुरावा नष्ट केलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, चेतन राजपूत, शैलेश सोनार, आबा चित्ते, किरण सावळे, प्रमोद काकडे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*