Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव धुळे ब्लॉग राजकीय

धुळे मनपा निवडणूक विशेष Blog : ना. गिरीश महाजन निवडणूकांचे किंगमेकर

Share

पंकज पाटील । देशदूत डिजीटल : जळगाव : राज्य मंत्रीमंडळात नंबर दोनचे मंत्री म्हणून जामनेरचे गिरीश महाजन यांंचा दरारा असला तरी त्या त्यात त्यांनी अधिकची भर पाडली आहे. नगरपालिका ते महापालिका निवडणूकांच्या विजयाचे ते  किंग मेकर ठरले आहेत. जामनेर नगरपालिका, शेंदुर्णी नगरपंचायत, जळगाव महापालिका आणिा आता धुळे महापालिकांमध्ये भाजपाला एक हाती सत्ता मिळवून देण्यात ना. गिरीश महाजन शतप्रतिशत यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे ना. महाजन यांचा आाता राज्य मंत्रीमंडळातच नव्हे तर केंद्रातही दरारा वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जामनेर नगरपालिका पायलट प्रोजेक्ट

गिरीश महाजन आणि जामनेर हे एक समिकरण होते. श्री. महाजन यांना निवडणूकीत पाडण्यासाठी अनेकांनी विविधांगी प्रयत्न केलेत. पंरतू मतदारांनी श्री. महाजन यांच्यावर विश्वास दाखत त्यांना एक हाती विजय सोपविला. जामनेर नगरपालिकेतील एक हाती विजय मिळविल्यानंतर श्री. महाजन यांचा निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास वाढला. प्रतिस्पर्धकांना कसे नामोहरम करायचे यांचे सूत्र नी गमक त्यांना गवसले. परिणामी जळगााव महापालिकेच्या निवडणूकीची धुरा त्यांच्यावर पक्षाने सोपविली. पक्षाने सोपविलेली जबाबदारी पूर्ण करण्यात ना. महाजन कधीच कमी पडलेले नाही. त्यानुसार श्री. महाजन यानी जळगाव महापालिकेच्या निवडणूकीची धुरा हाती घेतली. जळगाव महापालिकेवर माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या खान्देश विकास आघाडीची सत्ता होती. या सत्तेला दर निवडणूकीत भाजपातर्फे खिंडार पाडण्याचा प्रयत्न झाला. पंरतू सुरेशदादा जैन यांनी त्यांच्या राजकारणातील अनुभवामुळे तो परतवून महापालिका आपल्या हातात ठेवण्यात यश मिळविले. यावर्षाच्या निवडणूकीतही ऐनवेळी खान्देश विकास आघाडीऐवजी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवावी लागली. जळगावकराच्या मनात खान्देश विकास आघाडीचे नाव कोरले गेले होते. तर शिवसेनेचे नाव किरकोळ होेते. परिणामी शिवसेनेचा उमेदवार हा सुरेश दादांचा नाही, खान्देश विकास आघाडीचा नाही असा गैरसमज मतदारांतमध्ये झाला. कॉग्रेस आणि राष्ट्रवादीकडे तोलामालाचा व जनसंपर्क असलेला नेता, उमेदवार नव्हता. याचाच फायदा ना. गिरीश महाजन यांनी घेतला. खान्देश विकास आघाडी अर्थात सुरेशदादा जैन यांच्याकडील हमखास निवडूण येणार्‍या उमेदवारांना त्यांनी गळाला लावले. केंद्रात व राज्यात भाजपा असल्याचे पाहत खान्देश विकास आघाडीचे महत्वाचे उमेदवारच ना. महाजन यांनी आपल्या तंबूत ओढून घेतले. त्यामुळे सुरेशदादा जैन यांना चांगलाच धक्का बसला. आपले हक्काचे विजयी होणारे उमेदवार गेल्याने त्यांच्या जागी ऐनवेळी नवे उमेदवार शोधावे लागले.परिणामी शिवसेनेला बहुमतापर्यतचा आकाडाही गाठता आला नाही. गेली चाळीस वर्ष सत्तेस असलेल्या खाविआच्या सदस्यांना या निवडणूकीत मात्र विरोधात बसावे लागले. आणि या एक हाती विजयाने ना. महाजन यांच्या दरारा वाढविण्यात मोलाची भर टाकली. आणि भाजपा नेतृत्वाने धुळे महापालिकेचीही जबाबदारी त्यांच्यावर टाकली.

आ. अनिल गोटे, काँग्रेस, रॉकाचा विरोध नामोहरम ठरविला

पक्षाने ना. महाजन यांच्यावर धुळे मनपाची जबाबदारी टाकताच त्यांनी जळगाव पॅर्टनचा खुबीने वापर केला. त्यांना साथ मिळाली ती केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री ना. डॉ. सुभाष भामरे आणि पर्यटन मंत्री ना. रावळ यांची. या त्रिमुर्तीने शांत आणि संयमाने धुळ्याचा अभ्यास करत विरोधकांना गळाला लावले. विजयाची हमी देणारे उमेदवार भाजपाच्या तंबुत आल्याने भाजपाची ताकद मजबुत होत गेली. परंतू भाजपाचे सहयोगी आमदार असलेले अनिल गोटे यांनाही पक्ष आपल्यावर जबाबदारी टाकेल याचा अति आत्मविश्वास होता. गेल्या दोन वर्षापासून आ. अनिल गोटे विविध कारणांमुळे चर्चेत राहीले होते. त्यांनी शहरात काही चांगली कामेही केलीत. परंतू काहींची पोटदुखी झाली. पक्षांने निवडणूकीची जबाबदारी ना.महाजन यांच्यावर दिल्याने आ. अनिल गोटे यांचा स्वाभिमान दुखावला गेला. त्यांनी आमदारकी पणाला लावत हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत नेला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना शांत राहत त्यांच्याच नेतृत्वाखाली निवउणूक लढविण्याचे आश्वासन देत परत पाठवले.

मात्र आ. गोटे धुळ्यात येईपर्यत ना .महाजन, ना. भामरे, ना. रावळ आणि भाजपा शहराध्यक्ष यांनी उमेदवारांची यादी अंतिम करून त्यांना एबी फॉम देऊनही टाकले. त्यामुळे आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच आ. अनिल गोटे यांनी लोकसंग्राम या आपल्या पक्षातर्फे ही निवडणूक लढविली. अनिल गोटे यांनी गेल्या तीन महिन्यांपासून केलेला आक्रस्ताळेपणा,गुंडगिरी, अश्लिल भाषेचा वापर, निष्ठावंत, आयाराम-गयाराम हे मुद्दे घेऊन गोटे यांनी भाजपावर निशाणा साधला. सलग 15 वर्षे विरोध करीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवर्धन कदमबांडे यांच्याशी युतीचा कथित प्रस्ताव, राष्ट्रवादी सेना म्हणून उपमर्द केलेल्या शिवसेनेच्या पाच उमेदवारांना स्वयंस्फूर्तपणे दिलेला पाठिंबा आणि नंतर त्यांच्याकडून लोकसंग्रामच्या 13 उमदेवारांना मिळालेली पाठिंब्याची परतफेड, मतदारांना त्यांच्या विश्वासार्ह प्रतिमेविषयी शंकीत करुन गेली. भाजपा आपल्याशी शेवटच्या क्षणी जुळवून घेईल हा गोटे यांचा कयास मतदारांनी सपशेल फोल ठरविला.

राष्ट्रवादीला फुटीरतेने अपयश

सलग दहा वर्षे महापालिकेवर सत्ता असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसला पक्षातील 20 उमेदवारांनी ऐनवेळी धोका दिला. मातब्बर 20 नगरसेवक ऐनवेळी भाजपामध्ये गेल्याने नेते कदमबांडे यांना उमेदवारांचे नव्याने गणित मांडावे लागले. यामुळेही राष्ट्रावादीचे विजयाचे गणित चुकले. नी सत्ता सुंदरीचा त्याग करावा लागला.

विजयाचे शिल्पकार ना. महाजन

राज्य मंत्री मंडळात सध्या ना. महाजन हे सर्वांत पॉवर फुल मंत्री म्हणून ओळखले जात आहेत. दिल्लीतील अण्णा हजारे यांचे उपोषण सोडवण्यात थेट केंद्रातून ना. महाजन यांना शिष्टाईसाठी बोलावण्यात आले होते. त्यानी तेथे अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करून तब्बल दोन वेळा उपोषण सोडवले. त्यामुळे केंद्रातून ना. महाजन यांच्या शब्दाला किंमत मिळू लागली. या सर्व बाबींमुळे ना. महाजन यांनी गर्वाची बाधा होऊ दिली नाही. पक्षाने दिलेले काम प्रामाणिकपणे आणि यशस्वी पार पाडल्याने ना. महाजन यांच्यावर निवडणूकांची जबाबदारी देण्यात आली. आणि ना. महाजन यांनी त्यांच्या लिलयाने ती यशसव्ी करून दाखविली.

धुळे, जळगाव महापालिकेत भाजपाला बहुमताने विजय करत एक हाती सत्ता मिळवून दिली. गिरीश महाजन यांनी डॉ.सुभाष भामरे, जयकुमार रावल या मंत्र्यांसोबत जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांची मोट बांधत यशश्री खेचून आणत विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!