जीएसटी करापोटी मनपांना वाढीव निधी द्या !

0
धुळे । दि.1 । प्रतिनिधी-अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे अंधेरी मुंबई येथे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र महापौर परिषदेत धुळ्याच्या महापौर कल्पना महाले यांनी सहभाग घेतला.
यावेळी विविध ठराव करण्यात आले. यात जीएसटी करापोटी महानगरपालिकांना वाढीव निधी देण्याचा ठराव एकमुखाने करण्यात आला.

आज अंधेरी येथे ही परिषद घेण्यात आली. राज्यातील सुमारे 12 महापौरांनी या परिषदेत सहभाग घेतला. या परिषदेत मनपा कार्यप्रणालीत येणार्‍या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

आगामी काळात महापालिकेस मिळणारे जीएसटी करापोटी असलेले वाढीव अनुदान, कर्मचारी भरतीसाठी आस्थापना खर्चाची मर्यादा शिथिल करणे, महापौर पदाचे अधिकार, अधिनियमातील दुरुस्ती या विषयांवर परिषदेत चर्चा करण्यात येवून परिषदेत ठराव करुन शासनाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

या परिषदेला अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजीत चव्हाण, लक्ष्मण लटके, मुंबई, नागपूर, नासिक, धुळे, वसई विरार, कल्याण, डोंबवली, अकोला, नगर, पुणे, लातूर, सांगली, मिरज, मिराभाईंदर येथील महापौरांनी सहभाग घेतला.

 

 

 

LEAVE A REPLY

*