Type to search

Breaking News धुळे मुख्य बातम्या राजकीय

धुळ्यात ओबीसी महापौर

Share

मुंबई/धुळे । राज्यातील 27 महानगरपालिकामधील महापौर पदाची सोडत काढण्यात आली आहे. यात धुळ्यात मागास प्रवर्गातील (ओबीसी) तर जळगावला खुल्या प्रवर्गातील (ओपन) महिलेला महापौर पदाची संधी मिळणार असून मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, , कल्याण-डोंबिवली, सांगली, उल्हासनगर या पालिकांसाठी खुला प्रवर्ग, सर्वसाधारणसाठी महापौर आरक्षीत करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. आता ही मुदत 21 नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन महापौर आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात परिषद सभागृहात ही सोडत काढण्यात

आली. या महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. त्यानुसार आरक्षण सोडतीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे किती महापालिकांत महिलांना संधी मिळणार याचीही उत्सुकता होती.

महापौर पदासाठी कोणते आरक्षण पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आरक्षण सोडतीनंतर 21 नोव्हेंबर रोजी नवीन महापौर, उपमहापौरांची निवड होऊ शकते.

भाजपात 20 नगरसेवक दावेदार

धुळे । महापालिकेत विद्यमान महापौर हे खुल्या प्रवर्गातील असून त्याचा कार्यकाळ 30 जुन 2021 रोजी संपणार आहे. दिड वर्षानंतर नवीन आरक्षणानुसार ओबीसी राखीव प्रभागातील नगसेवक महापौर पदावर विराजमान होवु शकेल. धुळे महापालिकेत सत्ताधारी भाजपाकडे 10 महिला व 10 पुरूष असे 20 ओबीसी नगरसेवक आहेत. त्यामुळे नगरसेवकांपैकी कोणाला तरी संधी मिळेल.

सद्यस्थितीत महापौर चंद्रकांत सोनार महापौर पदावर विराजमान आहेत. त्यांची मुदत 30 जून 2021 रोजी नियमाप्रमाणे संपणार आहे. उर्वरित कालावधीसाठी नागरीकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित झालेले आहे. आज झालेल्या सोडती प्रसंगी प्रधान सचिव नगर विकास विभाग यांच्यासमवेत मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच सोडतीसाठी राज्यातून विविध महानगरपालिकांचे महापौर, स्थायी समिती सभापती, पदाधिकारी तसेच नगरसचिव अधिकारी उपस्थित होते. धुळे महानगरपालिकामार्फत आयुक्त अजित शेख, नगरसचिव मनोज वाघ, शेखर बनसोडे आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!