स्व.खा.मुकेशभाई पटेल यांना अभिवादन

0
शिरपूर । प्रतिनिधी-माजी खासदार स्व.मुकेशभाई पटेल यांच्या 15 व्या पुण्यतिथीनिमित्त दि.15 जून रोजी सकाळी 9 वाजता आ.काशिराम पावरा, टेक्सटाईल पार्क चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करुन श्रध्दांजली वाहण्यात आली.
आर.सी.पटेल फार्मसी कॉलेज कॅम्पसमधील एस.एम.पटेल ऑडीटोरीअम हॉलमध्ये श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी 9 वाजता प्रतिमा पूजन करुन सामुहीक श्रद्धांजली वाहण्यात आली.

आर.सी.पटेल शैक्षणिक संकुल, एस.व्ही.के.एम. संस्थेच्या विविध शाखा, शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व शाखांचे प्राचार्य, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुलाबपुष्प वाहून श्रद्धांजली वाहिली.

याप्रसंगी विविध संस्थांचे पदाधिकारी आदी अनेक मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस गुलाबपुष्प वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

 

 

LEAVE A REPLY

*