Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : डावलले नाही, भविष्यात मोठी जबाबदारी : खा. डॉ. सुभाष भामरे

Share

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या पंचवार्षिकमध्ये मतदार संघात जी कामं झाली त्यामुळेच जनतेने यंदाही प्रचंड मताधिक्याने निवडणून दिले आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता जास्तीत जास्त कामं मतदार संघासह जिल्हाभरात करण्याचा प्रयत्न करणार आहे.

तसेच आपल्याला मंत्रिमंडळात आता जरी स्थान मिळाले नसले तरी भविष्यात मोठी जबाबदारी मिळेल असा विश्वास माजी संरक्षण राज्यमंत्री आणि  धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. भामरे यांनी विश्वास व्यक्त केला.

ते पुनद बैठकीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बागलाणसह, पंचक्रोशीतील पिण्याच्या पाण्याबाबत खा. भामरे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत आयोजित बैठकीत सहभाग घेतला.

यावेळी पाणी टंचाईसह, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कशाप्रकारे निकाली काढता येईल यावर विचार मंथन करण्यात आले. यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य करत समाधान व्यक्त केले .

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!