Type to search

धुळे

मोहाडीतील वस्त्यांमध्ये नागरी समस्यांचा अभाव

Share

धुळे । शहरानजीक असलेल्या मोहाडी उपनगर परिसरातील म्हाडाच्या दीडशे खोल्या वस्त्यांमध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. परंतु मनपाच्या अधिकार्‍यांचे व लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष असल्यामुळे नागरी समस्या कायम आहे. याबाबत दखल घेतली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरीकांनी दिला आहे.

मोहाडी येथील वनश्री कॉलनी जवळून जाणारा मोहाडी ते सावळदे या रस्त्यांची तर दुरावस्था झाली आहे. सदर रस्त्यावर दिवसभरातून हजारो नागरिक, कामगार व शेतमजूरांचा वापर आहे. रस्त्यावरून वाहन चालवितांना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.

तसेच मोहाडी परिसरातील म्हाडाच्या वसाहतीतील गटारीचे सांडपाणी जवळीलच असलेल्या दीडशे खोली परिसरात असलेल्या मोठ्या खड्ड्यात सोडलेले आहे. त्यामुळे त्या पाण्याची दुर्गंधी सुटते. तसेच दीडशे खोली परिसरात डासांचे साम्राज्य वाढले आहे. व त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आता पावसाळा तोंडावर आला असल्याने जर परिसरातील नागरी समस्यांचे निराकरण करण्यात यावे. तसेच रस्त्यांची दुरूस्ती करावी या याठिकाणी अपघात होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. मोहाडी ते सावळदे रस्त्याची दुरुस्ती करावी. याबाबत दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!